Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthदिवसा झोपल्याने होऊ शकतात गंभीर आजार

दिवसा झोपल्याने होऊ शकतात गंभीर आजार

Subscribe

आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य आणि सकस आहाराची गरज असते तशी पुरेश्या झोपेची सुद्धा गरज असते. पण जर का वेळी अवेळी किंवा दिवसा झोप घेतल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होईल. प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी चांगल्या सवयींचा अवलंब करावा लागतो.आयुर्वेदामध्ये चांगल्या आरोग्यासाठी अनेक चांगल्या सवयींबाबत सांगण्यात आलं आहे. निरोगी आणि सुधृढ आरोग्यासाठी आयुर्वेदामधल्या काही गोष्टींचा अवलंब केल्यास त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल.
नक्कीच चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल.

उत्तम आरोग्यासाठी वेळच्या वेळी जेवण, झोप आणि व्यायाम या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. खाणं, पिणं, झोपणं या संदर्भात काही चुकीच्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. त्याचप्रमाणे दिवस झोपणं हे आयुर्वेदामध्ये चुकीचं आहे असं सांगण्यात आलं आहे. त्या मुळे शरीरावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

9 hacks to help you wake up early and not feel tired after sleeping | Tom's Guide

आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्याने कफ वाढतो आणि वात कमी होतो. तसेच कफामुळे होणाऱ्या आजारांचा त्रास वाढतो. पण वात असलेल्या लोकांना दिवसा झोपल्याने फायदा होऊ शकतो. पण जर का थकवा आल्याने किंवा कामाच्या ताणामुळे तुम्ही दिवसातून 15 ते 20 मिनिटे आराम करू शकता. पण सतत झोपणं चांगलं नाही.

- Advertisement -

दिवसा कोणी झोपू नये?

  • जर तुमचे वजन जास्त असेल आणि जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अश्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये.
  • ज्या व्यक्तींना तेलकट किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ खायला आवडत असतील किंवा अश्या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात होत असेल तर अश्या व्यक्तींनी दिवसा झोपणं टाळलं पाहिजे.
  • ज्या लोकांना कफाचा त्रास आहे अश्या व्यक्तींनीही दिवसा झोपू नये.
  • ज्यांना डायबेटीस किंवा हायपोथायरॉईडची समस्या आहे अश्या व्यक्तींनीही दिवसा झोपू नये.

हेही वाचा :

आयुर्वेदातील ‘हे’ हर्ब्स दातांसाठी ठरतील फायदेशीर

- Advertisment -

Manini