घरICC WC 2023IND vs SL : रोहित शर्मा फक्त 4 धावांवर बाद, पण 10...

IND vs SL : रोहित शर्मा फक्त 4 धावांवर बाद, पण 10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी केला होता डबल धमाका

Subscribe

मुंबई : भारतीय संघ सध्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आहे. भारताने आतापर्यंतचे सर्व 6 सामने जिंकले  आहेत आणि आज संघ सातवा सामना श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळत आहे. मुंबईचे वानखेडे स्टेडियम भारतीय कर्णधार रोहित शर्माचे होम ग्राउंड आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा आज पहिल्यांदाच त्याच्या होम ग्राउंडवर विश्वचषकामध्ये कर्णधार म्हणून खेळत आहे. त्यामुळे रोहितसाठी आजचा दिवस खूप खास आहे, परंतु आजच्या सामन्यात फक्त 4 धावा करून क्लिन बोल्ड झाला. असे असले तरी त्याने आजच्याच दिवशी मोठा विक्रम केला होता. (IND vs SL Rohit Sharma out for just 4 runs But 10 years ago a double blast was done on this day)

हेही वाचा – AUS vs ENG : मॅक्सवेलनंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का; खेळाडूंने घाईघाईत सोडला भारत

- Advertisement -

रोहित शर्मासाठी 2 नोव्हेंबर हा दिवस खूप खास आहे. कारण त्याने 10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले होते. रोहितने 158 चेंडूत 16 षटकारांच्या मदतीने 209 धावांची खेळी केली होती. त्यावेळी रोहित शर्मा हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतर दुहेरी शतके ठोकणारे जगातील तिसरा फलंदाज ठरला होता.

- Advertisement -

तीन द्विशत झळकावणारा एकमेव खेळाडू

रोहित शर्मानंतर जगातील अनेक खेळाडूंनी द्विशतके झळकावली आहेत, मात्र रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत तीन द्विशतके झळकावली आहेत. हा कारनामा अद्यापर्यंत जगातील एकाही खेळाडूला जमलेला नाही. रोहित शर्मानं 2013 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरोधात तब्बल 264 धावा केल्या होत्या. या धावा आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमधील वैयक्तित सर्वाधिक धावा आहेत. तसेच रोहित शर्मानं 2017 मध्ये पुन्हा श्रीलंकेविरुद्ध तिसरे द्विशतक केले आहे.

हेही वाचा – बाबर आझमवर संतापला शाहिद आफ्रिदी, म्हणाला- विराट कोहली आणि केएल राहुलकडून…

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितची मोठी खेळी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धची द्विपक्षीय मालिका खूपच रोमांचक झाली होती. भारतीय संघ या मालिकेतील निर्णायक सामना बेंगळुरूमध्ये खेळत होती आणि या सामन्यात रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्फोटक खेळी करताना सर्वांना चकित केले होते. कारण आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एवढी मोठी खेळी जगातील कोणत्याही खेळाडूने खेळलेली नाही. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 षटकात 6 विकेट गमावून 383 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना 57 धावांनी गमावला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -