Saturday, April 27, 2024
घरमानिनीआला उन्हाळा, तब्येत सांभाळा, करा या पेयांचे सेवन

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, करा या पेयांचे सेवन

Subscribe

या दिवसात मुबलक पाणी पिणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या पेयाद्वारे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढता येते.

मार्च महिना सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहीलेले असताना अचानक तापमानात वाढ झाली असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. येत्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढणार असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच काळजी घेणे गरजेचे झाले आहे. प्रामुख्याने या दिवसात तापमानात वाढ झाल्याने अंगाला घाम येतो. घामाद्वारे जरी शरीरारातील विषारी द्रव बाहेर पडत असली तरी त्याबरोबरच पाण्याचा अंशही कमी होतो. यामुळे या दिवसात मुबलक पाणी पिणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या पेयाद्वारे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढता येते. त्यासाठी लिंबाचे सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, नीरा, उसाचा रस, जलजिरा, आवळा सरबत अशा अनेक पेयांचे नियमित सेवन करावे.

नारळ पाणी

- Advertisement -

नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन दिवसाला एकदा तरी नारळ पाणी प्यायला हवे. त्यातही ज्यांना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी या दिवसात पाणी जास्तीत जास्त प्यावे. तसेच नारळ पाणीही पित राहावे. उन्हाळ्यात सतत घाम येत असल्याने शरीरातील पाणी कमी होत असते. अशावेळी चक्कर येणे ब्लड प्रेशर लॉ होणे अशा आरोग्यविश्यक समस्या निर्माण होतात. यामुळे नारळ पाणी आणि पाणी जास्तीत जास्त प्यावे.

- Advertisement -

कोकम सरबत

आरोग्यवर्धक असून प्रकृतीने थंड आहे. यामुळे शरीरात पित्त, उष्णता वाढल्यास कोकम सरबत पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच कोकममध्ये हायड्रॉक्सिसिट्रिक अ‍ॅसिड असते ज्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. तसेच शरीरात थंडावा निर्माण होतो. यामुळे उन्हाळ्यात कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरते.

ताक
ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. ताक हे थंड असल्याने शरीराचे तापमान समप्रमाणात राखण्याचे काम ताक करते. ताक उन्हाळ्यात पिणे फायदेशीर तर आहेच पण इतर कोणत्याही सिझनमध्ये ताक पिल्यास नुकसान होत नाही. ताकात हिंग, कोथिंबीर, पुदिना आणि धने जिरेपूड टाकल्यास अधिक चवीष्ट लागते. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आपण ताकाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आणि फायदेशीर आहे.

हे पदार्थ देतील उन्हाळ्यात गारवा

जलजिरा
उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी जलजिरा हे उपयुक्त पेय आहे. विशेष म्हणजे जलजिरा आपण घरीही बनवू शकतो. जिऱ्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच चयपचयाच्या तक्रारीही दूर होतात.

बेलाचा रस
उन्हाळ्यात बेलाच्या फळाचा रस पिणे फायदेशीर असते. हे रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवण्याचे काम बेलाच्या रस करते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच कोलेस्टेरॉल धोकाही कमी होतो.

 

 

 

 

- Advertisment -

Manini