उन्हाळा सुरु झाल्यावर अनेक महिला घरच्या घरी उडदाचे, तांदळाचे पापड बनवतात. आज आम्ही तुम्हाला नाचणीचे पापड कसे बनवायला हे सांगणार आहोत. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं आहेत.
साहित्य :
1/2 किलो ग्राम नाचणीचे पीठ
1 चमचा तीळ
1 चमचा जिरे
1 चमचा हिंग
1 चमचा पापड खार
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम नाचणी धुवून वाळवून घ्या आणि मग मिक्सरमध्ये किंवा गिरणीतून दळून आणा.
- आता एका जाड पातेल्यात 1 लिटर पाणी गरम करायला ठेवावे.
- आता त्यामध्ये हिंग, जिरे, तीळ, पापड खार, मीठ घालून पाणी उकळल्यावर नाचणीचे पीठ घालून मिक्स करून घ्या.
- पीठ शिजल्यावर थोडे पीठ परातीत काढून घ्या. थोड्यावेळान ते थंड झाल्यावर ते मळून एका प्लास्टिक पेपरला थोडेसे तेल लावून पापड लाटून घ्या.
- पापड थोडा मोठा लाटून एका लहान वाटीने छोटे छोटे पापड कापून घ्या.
- अश्या प्रकारे पापड बनवून उन्हात वाळवा.
- Advertisement -
हेही वाचा :