घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha Election 2024 : राणे की सामंत, रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीकडून कोणाची लागणार...

Lok Sabha Election 2024 : राणे की सामंत, रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीकडून कोणाची लागणार लॉटरी?

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रीया शुक्रवार 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असले तरी, अद्याप राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. विशेष म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा वाढला आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रीया शुक्रवार 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असले तरी, अद्याप राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. विशेष म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा वाढला आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्याकरीता निवडणूकप्रक्रिया सुरू असून 19 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. अशात, या मतदारसंघात शिवसेनेसह भाजपकडूनही दावा करण्यात आला आहे. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचाराला सुरूवात केली असून, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीकडून कोणाची लॉटरी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024 ratnagiri sindhudurg constituency kiran samant and narayan rane applications taken)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आहेत. पण विनायक राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कायम असून त्यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे. पण महायुतीकडून अद्याप या मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशात महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. मात्र, भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेची जागा असलेल्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा उमेदवार देण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

किरण सामंत की नारायण राणे?

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अजूनही रस्सीखेच सुरु आहे. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले. त्यानंतर आता किरण सामंत यांनीही 4 उमेदवारी अर्ज घेतले आहे. नुकताच किरण सामंत यांनी नागपूर येथे जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. कारण शिवसेनेकडून किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींची गॅरेंटी; गरिबांना पुढील 5 वर्ष रेशनचे अन्न मोफत – फडणवीस

- Advertisement -

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघात 7 मे रोजी मतदान असून 12 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप महायुतीकडून उमेदावार जाहीर झालेला नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आजपासून दोन दिवस रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांची उत्तर रत्नागिरी मतदार संघात सभा होणार आहे. तसेच, चिपळूण तालुक्यातील पोफळी आणि चिपळूण शहरात आज सभा होणार आहे. तसेच उद्या संगमेश्वर आणि देवरूख शहरात सभा होणार आहे.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसारखा वापर केला; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -