घरक्राइमनाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच

नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच

Subscribe

नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील माणिकनगर येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी(एमएच ४१ एडब्ल्यू २४४२) चोरीला गेली. हर्षदा दिलीप निकम (रा. गजवक्र अपार्टमेंट, माणिकनगर) यांच्या फिर्यादीनुसार, ८ एप्रिल रोजी मध्यरात्री मोपेड चोरीला गेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम दिलीप नवाळे (रा. पाटील रेसिडेन्सी, विसे मळा, कॅनडा कॉर्नर) यांची दुचाकी (एमएच १७ झेड ९३४३) शनिवारी (दि.१३) सकाळी सातच्या सुमारास गोल्फ क्लब मैदानाच्या प्रवेशद्वार येथे पार्क केलेली असताना चोरट्याने चोरून नेली.

दुचाकीने कट मारल्याने बुलेटचालक ठार; एक जखमी

गोविंदनगर येथील सागर स्वीटसमोर दुचाकीने कट मारल्याने बुलेटला अपघात झाला असता यात एकजण ठार झाला असून, बुलेटस्वार जखमी आहे. सौरभ हंसराज गुप्ता (२६, रा. राजीवनगर) असे मयत युवकाचे नाव आहे तर, रवी सुभाष दानोदिया (२७, रा. राधाश्री अपार्टमेंट, राजीवनगर) हा जखमी आहे. अंमलदार देविदास गाढवे यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. १३) रवी व सौरभ हे बुलेटवरून जात असताना गोविंदनगर येथील सागर स्वीटसमोर त्यांच्या बुलेटला दुचाकीस्वाराने कट मारला. त्यामुळे बुलेट स्लीप होऊन झालेल्या अपघातामध्ये सौरभ गंभीररित्या जखमी होऊन ठार झाला. तर रवी जखमी आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कामटवाडा रोडवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. केतन केशव चव्हाण (३०, रा. कृष्णा कॉम्प्लेक्स, काठे गल्ली) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रियंका श्रीकांत पवार (रा. काठेगल्ली) यांच्या फिर्यादीनुसार, २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सदरचा अपघात झाला होता. याप्रकरणी अंबड पोलिसात अनोळखी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद फ्लॅटमध्ये दागिने चोरी

राजीवनगरमधील अश्वमेघ कॉलनीत बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी करीत ७७ हजार ९५० रुपयांचे दागिने चोरून नेले. शुभम महेंद्र पगारे (रा. सागर अपार्टमेंट) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. १३) मध्यरात्री सदरील घरफोडी झाली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

वाहन पार्किंगवरून दाम्पत्याला मारहाण

जेलरोड परिसरातील पिंटो कॉलनीत वाहन पार्क करण्यासाठी संशयिताला बाजूला व्हा असे म्हटल्याच्या रागातून संशयितांनी दाम्पत्याला घरात जाऊन मारहाण केली, तसेच पीडितेशी अश्लिल वर्तन करीत विनयभंग केला. विनोद सुरेश केदारे (३८), प्रियंका विनोद केदारे (३५, रा. पिंटो कॉलनी, जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, २४ जून २०२३ रोजी रात्री साडेआठ वाजता सदरचा प्रकार घडला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसात विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उधारीवर शर्ट न दिल्याने शिवीगाळ, मारहाण

शिवाजीनगर येथे उधारीवर शर्ट दिला नाही याचा राग धरून संशयिताने दोघांना शिवीगाळ, मारहाण केल्याची घटना घडली. मयुर गजानन पोळकर (रा. साईसमर्थ अपार्टमेंट, शिवाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. अमन देविदास सूर्यवंशी (रा. रामेश्वर कॉलनी, श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे महाकाल फॅशन हे दुकान असून शनिवारी (ता. १३) शर्ट न दिल्यामुळे संशयिताने मारहाण करीत कोयता दाखविला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यत आला ाअहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -