Monday, May 6, 2024
घरमानिनीटिपू सुलतानच्या मनावर राज्य करायची रुकाय्या बानो

टिपू सुलतानच्या मनावर राज्य करायची रुकाय्या बानो

Subscribe

म्हैसूर मधील टायगर नावाने प्रसिद्ध असलेला टीपू सुल्तानाने इंग्रजांच्याविरोधात केलेल्या युद्धांमध्ये हुशारीने कामगिरी केली होती. याच कामगिरीसाठी त्याला ओळखले जाते. मैसूरचे सुल्तान हैदर अली यांचा सर्वात लहान मुलगा टीपू सुल्तान हा १७८२ मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनतर सिंहासनावर बसला. शासकाच्या रुपात त्याने आपल्या शासनकाळात काही गोष्टी लागू केल्या.

या व्यतिरिक्त टीपूच्या पत्नींबद्दल ही फार त्या काळाच चर्चा व्हायची. पण आजही टीपूच्या बेगमांबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. इतिहासकार किरमानी यांच्या मते, टीपू सुल्तान याच्या तीन पत्नी होत्या. त्यामध्ये पादशाह बेगम, रुकय्या बानो बेगम आणि खदीजा जमानी बेगम.

- Advertisement -

९९१ ची गोष्ट आहे, टीपूच्या लग्नासंबंधित ही कथा तेव्हा सुरु होते जेव्हा त्याचे वडील हैदर अली खान अर्काटच्या इमाम साहिब बक्शी यांच्याकडे आपल्या मुलासाठी त्यांची मुलगी नायुत हिचा हात मागण्यासाठी गेले होते. परंतु टीपू सुल्तानच्या आईला हे आवडले नाही. तिला टीपूचे लग्न आपले निकटवर्तीय लाला मिया यांच्या मुलीशी करायचे होते. यासाठी लग्नाचा दिवस ही ठरला होता.

- Advertisement -

हैदर अलींना जेव्हा हे कळले तेव्हा ते फार संतप्त झाले. कारण त्यांनी इमाम साहिब यांना मुलाच्या लग्नाचे वचन दिले होते. हैदर अलीने आदेश दिला की, ठरवलेल्या तारखेलाच त्या दोघांचे लग्न होईल. आदेशानुसार टीपू सुल्ताचा निकाह दोन्ही मुलींशी केला गेला.

इमाम बक्शी यांची मुलगी नायूत, तिला पादशाह बेगम असे नाव दिले गेले, तर टीपू सुल्तानसाठी नाममात्र पत्नी राहिली. तर लाला मिया यांची मुलगी रुकैया बानो बेगम हिला सुल्तानच्या नजरेत फार महत्व होते. दरम्यान, १७९२ मधअये टीपू आण इंग्रजांमधअये श्रीरंगपट्टनमच्या लढाईच्याच दिवशी रुकाय्या बानो हिचा मृत्यू झाला.

मुलाला जन्म देताना झाला तिसऱ्या पत्नीचा मृत्यू
१७९६ मध्ये टीपूने खदीजा जमन बेगम हिच्याशी निकाह केला. परंतु एका वर्षातच मुलाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला.

जेव्हा जनानखाना इंग्रजांच्या ताब्यात गेला…
इंग्रज आणि म्हैसूर मध्ये झालेल्या चौथ्या युद्धानंतर ब्रिटिश सरकारने त्याच्या जनानखान्यांना सुद्धा आपल्या ताब्यात घेतले होते. त्या जनाना खान्याचा इंचार्ज झालेल्या एका इंग्रजी अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, टीपू सुल्तानची चौथी पत्नी सुद्धा होती. तिचे नाव बुरांटी बेगम असे होते.

त्या अधिकाऱ्याने अशी सुद्धा माहिती दिली की, टीपू सुल्तानचे एकुण १२ मुलं आणि ८ मुली जीवंत होत्या. त्यामधील सर्वाधिक मोठा मुलगा फतेह बहादुर होता. त्याने या गोष्टीवर आश्चर्य व्यक्त केले होते की, सुल्तानच्या या मुलांच्या आई बद्दल काहीच माहिती नव्हती.

टीपूच्या हरममध्ये होत्या ६०१ महिला
Tiger: The Life of Tipu Sultan च्या लेखिका केट ब्रिटलबँक यांनी टीपू सुल्तानच्या हरम बद्दल माहिती दिली आहे. त्यांनी असे लिहिले की, १९७७ मध्ये श्रीरंगपट्टनम येथील टीपू सुल्तानच्या हरममध्ये जवळजवळ ६०१ महिला होत्या.

या महिला केवळ टीपू सुल्तानच्या नव्हे तर त्याचे वडिल हैदर अली यांच्या सुद्धा होत्या. यापैकी ३३३ महिला टीपू सुल्तानच्या होत्या. तर २६८ महिला या हैदर अली यांच्या होत्या. हैदर अली यांच्या मृत्यूनंतर त्या महिला त्या हरम मध्ये होत्या. जनानाची देखरेख करण्यासाठी किन्नर लोकांना ठेवले गेले होते.


हेही वाचा- 2023 मध्ये देखील अनेकांवर मृत्यूचं सावट? काय आहे बाबा वेंगाची यंदाची भविष्यवाणी

- Advertisment -

Manini