घरलाईफस्टाईलप्रवासादरम्यान फसवणूक होऊ नये यासाठी खास टीप्स

प्रवासादरम्यान फसवणूक होऊ नये यासाठी खास टीप्स

Subscribe

प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. बहुतांश वेळा पाहिले जाते की, भटकंती करणाऱ्यांना सतत फिरण्याची आवड असते. परंतु जेव्हा ट्रिप प्लॅन करता तेव्हा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुमच्या ट्रिपचा प्लॅन फिसकटू शकतो. काही वेळेस असे ही होते की, एखाद्या नव्या ठिकाणाची पुरेसी माहिती नसेल तर फसवणूक ही होते. अशावेळी तुम्ही काय केले पाहिजे याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

-हॉटेल बुकिंगवेळी फसवणूक
जेव्हा प्रवासादरम्यान फसवणूकी बद्दल बोलले जाते तेव्हा हॉटेल बुकिंग त्यामधील सर्वात कॉमन गोष्ट आहे. आजकाल बहुतांश लोक ऑनलाईन बुकिंग करणे पसंद करतात. वेबसाइटवर हॉटेल संबंधित सर्वकाही लिहिलेले असते त्यामुळे लगेच बुकिंग केले जाते. मात्र वास्तवात जे त्या वेबसाइटवर दिले गेले आहेत त्या सुविधा तेथे प्रत्यक्षात गेल्यानंतर मिळत नाहीत. त्यामुळे हॉटेल बुकिंग करण्यापूर्वी त्याचा रिव्हू जरुर वाचा.

- Advertisement -

-मंदिर पूजेवेळी फसवणूक
जर तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जात असाल तर येथे हमखास तुमची फसवणूक होऊ शकते. मंदिरात पूजेच्या नावाखाली तुमची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला या ठिकाणी असे पंडित मिळतील जे विशेष पूजेच्या नावाखाली हजारो रुपये लुटू शकतात. यामुळे यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही पंडितांच्या बोलण्याला भुलू नका. स्वत: हून पुजा करा. मात्र एखादी विषेश पुजा करायची असेल तर आधीच पुजेच्या पैशांसंबंधित बोलून घ्या.

-टुरिस्ट गाइड हायर करताना फसवणूक
जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरायला जाताना आपण काही वेळेस टुरिस्ट गाइड हायर करतो. तो आपल्याला तेथील विविध ठिकाणांबद्दल सांगत राहतो. मात्र त्यांना आपल्याला यासाठी पैसे द्यावे लागतात. कधीकधी आपल्याला त्या टुरिस्ट गाइडला नक्की किती पैसे द्यायचे हे कळत नाही आणि तो सांगेल ती रक्कम आपण त्याला देतो. यामध्ये सुद्धा फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्हीच त्या ठिकाणाची सर्व माहिती मिळवा. जेणेकरुन टुरिस्ट गाइडची मदत तुम्हाला घ्यायला लागणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा- एकट्या प्रवासाला जाताय मग ‘या’ चुका टाळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -