घरलाईफस्टाईलहाइकिंगवेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

हाइकिंगवेळी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

फिरण्याची आवड प्रत्येकालाच असते. मात्र काही लोक अशी असतात की, ज्यांना डोंगरांवर फिरायला जाणे आवडते. अशातच बहुतांश जणांना अॅडवेंचर अॅक्टिव्हिटी करण्यास फार उत्सुक असतात. कारण हाइकिंग दरम्यान डोंगर, नद्या, झरे आण घनदाट जंगलात प्रवास करण्याचा अनुभव काहींना घ्यायचा असतो. मात्र काहीवेळेस अशी बातमी येते की, काही लोक हाइकिंगसाठी पर्वतांमध्ये जातात आणि बेपत्ता होतात. अशातच हाइकिंगवेळी सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे हाइकिंगला जात असाल तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवल्या पाहिजेत. (Hiking safety tips)

हाइकिंगवेळी ग्रुपपासून वेगळे होऊ नका
हाइकिंग करण्यासाठी काही लोक एकत्रित जातात. मात्र नंतर असे कळते की, काही लोक वेगळ्याच दिशेने हाइकिंग करण्यासाठी निघाले आहेत. अशातच तुम्ही पहिल्यांदाच हाइकिंगला जात असाल तर ग्रुपपासून वेगळे होऊ नका. हाइकिंगवेळी ग्रुप सोबत रहाल तर सुरक्षित प्रवास करू शकता.

- Advertisement -

हाइकिंगवेळी प्राण्यांना त्रास देऊ नका
घनदाट जंगलात हाइकिंग करताना जंगली किटे-किटकांचा सामना करावा लागतो. त्याचसोबत तेथे असे काही प्राणी दिसतात त्यांना पाहून आपण घाबरतो. किंवा त्यांना आपल्यापासून दूर करण्यासाठी काहीतरी करतो. मात्र जर तुम्ही तेथील प्राण्यांना त्रास दिला तर समस्या उद्भवू शकते.

- Advertisement -

पावसाळ्यात हाइकिंगला जाणे टाळा
जरी तुम्ही पावसाळ्यात हाइकिंगला जाण्याचा विचार करत असाल तर प्लॅन करू नका. अन्यथा समस्या उद्भवू शकते. मुसळधार पावसात काही लोक बेपत्ता होऊ शकतात. लँन्डस्लाइड, वेगाने वाहणारे पाणी, झाडं पडणे अशा गोष्टी पावसाळ्यात होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात हाइकिंगला जाणे टाळा. (Hiking safety tips)

हाइकिंगला जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला सांगा
डोंगराळ भाग किंवा घनदाट जंगलात हाइकिंगला जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला सांगणे फार महत्त्वाचे असते. जेणेकरुन हाइकिंगवेळी अचानक संकट आले तर स्थानिक प्रशासन मदत करू शकते.

हाइकिंगला जाताना ‘या’ टीप्स ही लक्षात ठेवा
-हाइकिंगला जाताना मेडिसिन किट तुमच्यासोबत ठेवा
-हाइकिंगला निघण्यापूर्वी वातावरणाचा अंदाज घ्या
-मोबाईल फुल चार्ज करा. पॉवर बँक ही सोबत ठेवा


हेही वाचा- पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? मग ‘हे’ आहेत मुंबईतील Best Places

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -