घरमहाराष्ट्रBacchu Kadu : नवनीत राणा यांच्यावर बच्चू कडू यांचा प्रहार, म्हणाले...

Bacchu Kadu : नवनीत राणा यांच्यावर बच्चू कडू यांचा प्रहार, म्हणाले…

Subscribe

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर जोरदार निशाणा साधला आहे. नवनीत राणा आनंदराज आंबेडकर यांच्यापेक्षाही कमी मते मिळतील आणि त्या चौथ्या क्रमांकावर घसरतील, असा प्रहार बच्चू कडू यांनी केला आहे.

अमरावती : अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बहाल करून सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी (ता. 04 एप्रिल) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला. त्यामुळे नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरावती लोकसभेसाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण यावरून आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर जोरदार निशाणा साधला आहे. नवनीत राणा आनंदराज आंबेडकर यांच्यापेक्षाही कमी मते मिळतील आणि त्या चौथ्या क्रमांकावर घसरतील, असा प्रहार बच्चू कडू यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024 Bacchu Kadu criticizes Navneet Rana)

भाजपाच्यावतीने खासदार नवनीत राणा अमरावती लोकसभेतून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर प्रसार माध्यमांनी अचलपूर विधानसभेचे आमदार बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या निवडणुकीत नवनीत राणा यांची चौथ्या क्रमांकावर घसरण होईल. त्यांना आनंदराज आंबेडकर यांच्यापेक्षाही कमी मते मिळतील. आमच्या उमेदवाराचा अर्ज भरताना फक्त गर्दी नव्हे तर दर्दी लोकही होते. त्यांच्याकडे गर्दी आहे पण त्यांना निम्मी मतेही मिळणार नाहीत. त्यामुळेच त्यांची चौथ्या क्रमांकावर घसरण होईल, असे बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Navneet Rana : सुप्रीम कोर्टाने जातप्रमाणपत्र ठरवले वैध, नवनीत राणांची उमेदवारी अबाधित

तसेच, नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही बच्चू कडू यांनी आपले मत व्यक्त केले. याबाबत ते म्हणाले की, या प्रकरणाचा निकाल लागायच्या आधीच भापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पण ही आता तानाशाहीची हाईट झाली आहे. सर्वसामान्यांचा न्यायालयावर विश्वास आहे. आणि तो विश्वास जर असा पायदळी तुडवला जात असेल तर सगळे संपल्यात जमा आहे. त्यामुळे आता महायुतीत घटक पक्ष असून देखील बच्चू कडू यांनी नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बहाल करून सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला. 2021मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. सर्वोच्च न्यायालायने उच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता भाजपाच्या उमेदवार म्हणून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा… Loksabha Election 2024 : दिलेले निर्देश व्यवस्थित पाळा अन्यथा…सर्वोच्च न्यायालयाची अजित पवारांना तंबी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -