Thursday, December 7, 2023
घरमानिनीFashionअंडर बूब स्वेटिंगच्या समस्येपासून असे रहा दूर

अंडर बूब स्वेटिंगच्या समस्येपासून असे रहा दूर

Subscribe

अधिक उष्णतेमुळे किंवा पुरेशी हवा शरिराला न मिळाल्याने घाम येऊ लागतो. अशातच अंडर बूब स्वेटिंगची समस्या बहुतांश महिलांना सतावते. खरंतर ही पूर्णपणे नैसर्गिक आणि बायोलॉजिकल प्रक्रिया आहे. यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. समस्या तेव्हा उद्भवू शकते जेव्हा या ठिकाणी खाज येण्याची समस्या निर्माण होते. अंडरबूब स्वेटिंगच्या कारणास्तव त्वचेवर लाल दाणे येऊ लागतात. अशातच या समस्येपासून कसे दूर रहावे याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

ज्या महिलांचे स्तन मोठे आणि झुकलेले असतात त्यांच्यामध्ये ही समस्या सामान्य आहे. उन्हाळ्यात त्यांना असा अनुभव येतो की, त्यांच्या बूबच्या वरील भागाजवळ घाम येऊ लागतो. बूबची स्किन जेव्हा खालच्या स्किनला स्पर्श करते तेव्हा घामाला इवेपोरेट होण्यास समस्या उद्भवते. अशातच स्तनांखाली घाम जमा होऊ लागतो. स्किनमध्ये फ्रिक्शन झाल्यास, चुकीची ब्रा निवडल्यास, हवा खेळती न राहिल्यास बूब स्वेटिंगची समस्या उद्भवू शकते.

- Advertisement -

कसे दूर रहाल?
-सिंथेटिक किंवा पॅडेड ब्रा घालू नका
बहुतांश ब्रा पॉलिस्टर किंवा रेयॉन सारख्या गोष्टींपासू तयार केली जाते. सिंथेटिक कापडामुळे हवा खेळती राहत नाही. अशातच गरम फार होते. मऊ, सुती आणि नैसर्गिक रुपात श्वास घेता येईल अशा कापडाच्या ब्रा वापरण्याचा सल्ला दिला जातो. फुल सपोर्ट ब्रा किंवा पुश अप ब्रा सुद्धा स्तनांना खाली येण्याऐवजी ते शेप मध्ये राहण्यास मदत करतात. त्यामुळे पॅडेड असणाऱ्या ब्रा घालू नका. यामुळे अधिक घाम येऊ शकतो.

- Advertisement -

-पँन्टी लाइनरचा वापर करा
घट टॉप किंवा ब्रा घालण्यापासून दूर रहा. अंडर बूब स्वेटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पँन्टी लाइनरची मदत घ्या. पँन्टी लाइनरचा वापर एक हॅकच्या रुपात केला जाऊ शकतो. घाम शोषून घेणे आणि कपड्यांवर डाग लागण्यापासून तुम्ही दूर राहता. अंडर बूब स्वेटिंगससाठी तुम्ही ब्रा च्या आतमध्ये पँन्टी लाइनर ठेवले जाऊ शकते.

-पावडरची मदत
कपडे घालण्यापूर्वी ब्रा कप आणि रिब केजवर कोणतीही उत्तम पावडर टाकू शकता. पावडर घाम शोषून घेण्यास मदत करू शकते. कोणत्याही प्रकारच्या स्किन फ्रिक्शन किंवा रेड रेशेजपासून दूर राहण्यास मदत करू शकते.


हेही वाचा- स्वत: साठी अशी निवडा परफेक्ट ब्रा

 

- Advertisment -

Manini