घरमहाराष्ट्रयाचा अर्थ पेपर फुटला आहे... धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा टोला

याचा अर्थ पेपर फुटला आहे… धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा टोला

Subscribe

6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाकडून सर्व गोष्टींचा फैसला करण्यात येईल, असे विधान काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आले होते. ज्याबद्दल आज (ता. 02 ऑक्टोबर) विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याकडून धनंजय मुंडे यांची कानउघडणी करण्यात आली.

वर्धा : ते इलेक्शन कमिशन झाले आहेत का? म्हणजे ते इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का? दिल्लीच्या अदृश्य हातांनी त्यांना काही वेगळी बातमी दिली आहे का? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते असलेले धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाकडून सर्व गोष्टींचा फैसला करण्यात येईल, असे विधान काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आले होते. ज्याबद्दल आज (ता. 02 ऑक्टोबर) विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याकडून धनंजय मुंडे यांची कानउघडणी करण्यात आली. (Supriya Sule attack on Dhananjay Munde’s statement)

हेही वाचा – भाजपाची बेगडी ओबीसी जागर यात्रा…, विजय वडेट्टीवारांचे बावनकुळेंना 10 प्रश्न

- Advertisement -

सुप्रिया सुळे या आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वर्ध्यातील सेवाग्रामला भेट दिली. ज्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देत म्हणाल्या की, ते इलेक्शन कमिशन झाले आहेत का? म्हणजे ते इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का? दिल्लीच्या अदृश्य हातांनी त्यांना काही वेगळी बातमी दिली आहे का? याचा अर्थ मग आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळणार की नाही. जर प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे निवडणूक आयोगाच्या आधी तारखा सांगत असतील तर याचा अर्थ पेपर फुटला आहे. जर पेपर फुटला असेल तर मग आम्ही निवडणूक आयोगाला नक्कीच प्रश्न विचारू. तुमची ही तारिख या दोघांना कशी कळली? अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

वारंवार जितेंद्र आव्हाड यांना सांगावे लागते की शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्याबाबतीतले उत्तर आम्हाला द्यायचे नाही. आता हा विषय पूर्णपणे निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे निवडणूक आयोग याबाबतीत 6 ऑक्टोबरला निर्णय देणार आहे. त्यामुळे याबाबतची सर्वांनीच वाट पाहावी. पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणाचे आहे, याबाबत सध्या तरी कोणाच्याही मनात कोणताही संभ्रम नसण्याची कोणतीही गरज नाही. तसेच, हे दोन विषय आहेत. निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण आहे. 6 तारखेला या प्रकरणाची सुनावणी आहे, असे धनंजय मुंडे यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -