घरक्राइमPen Crime News : पेणच्या डॉक्टरला 'या' गुन्ह्यात एसीबीकडून अटक

Pen Crime News : पेणच्या डॉक्टरला ‘या’ गुन्ह्यात एसीबीकडून अटक

Subscribe

डॉ. विजय गवळी हे पेण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असून २०१८ मध्ये त्यांना लाच घेताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्या मालमत्ताची चौकशी केली असता उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आढळली.

पेण : येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय एकनाथ गवळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. डॉ. गवळी यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आढळल्याने त्यांना त्यांच्या पत्नीसह अटक झाली आहे. या घटनेने पेण तालुक्यात खळबळ उडाली आहे. डॉ. गवळी आणि त्यांच्या नर्स पत्नी वर्षा गवळी यांना १० एप्रिल रोजी अटक झाली आहे.

डॉ. विजय एकनाथ गवळी (वय ५४) आणि त्यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे त्यांच्या ज्ञान उत्पन्नापेक्षा एक कोटी ५२ लाख ४० हजार ५३० रुपयांची मालमत्ता अधिक म्हणजेच बेहिशेबी असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षा गवळी या देखील पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेत आहेत. १ जानेवारी २००८ ते १ सप्टेंबर २०१८ या कालावधीतील त्यांच्या मिळकतीचा विचार केला गेला आहे. त्यामुळे एसीबीने त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Lok Sabha Election 2024 : पेणमधील वीटभट्टी-हॉटेलमालक ७ मे रोजी काय करणार?

नक्की काय घडले?

डॉ. विजय गवळी हे पेण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असताना त्यांच्यावर १९ सप्टेंबर २०१८ रोजी लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पाच हजारांची लाच घेताना त्यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक विवेक जोशी आणि किरणकुमार बकाळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून एसीबीने २३ लाख ९६ हजार रुपये हस्तगत केले होते.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Teachers News : देशाचं भविष्य घडवणाऱ्या गुरुजींची अल्प वेतनावर गुजराण

त्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या १० वर्षांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. त्यात सरकारी नोकरीच्या कालावधीत पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून अपसंपदा जमवल्याचे सिद्ध झाले. त्यांच्याकडे आणि कुटुंबीयांच्या नावे दीड कोटीची अपसंपदा असल्याचे या चौकशीत उघड झाले. ही बेहिशेबी मालमत्ता एकूण उत्पन्नाच्या ४४.५६ टक्के आहे.

चौकशीत डॉ. गवळी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे पेण, पनवेलसह नवी मुंबईतील खारघर, कोल्हापूर, पुणे येथे सदनिका, गाळे, जमिनी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणी एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि तपास अधिकारी शशिकांत पाडावे यांची तपास केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -