घरलाईफस्टाईलवर्कींग वुमन.. नोकरीतच नाही तर घर सांभाळण्यातही पुढे

वर्कींग वुमन.. नोकरीतच नाही तर घर सांभाळण्यातही पुढे

Subscribe

आपल्याकडे वर्कींग वुमन म्हणजेच नोकरी करणाऱ्या महिलांकडे बघण्याचा सगळ्यांचा वेगळा दृष्टीकोन आहे. करियर करणाऱ्या महिलांचे घराकडे लक्ष नसते. नोकरदार महिलांना घर सांभाळता येत नाही किंवा कुटुंबाची काळजी घेता येत नाही असा आरोप नेहमीच केला जातो. त्यामुळेच आपलाकडे अनेक घरांमध्ये लग्नानंतर महिलांना नोकरी करण्यास मनाई असते. कारण त्याच्या नजरेत या महिला घरापेक्षा त्यांच्या कामाला प्राधान्य देतात.नोकरदार महिलांना नेहमीच त्यांच्या कुटुंबाप्रती बेजबाबदार आणि निष्काळजी मानले गेले आहे.

यामुळे काम करणाऱ्या महिलांना अनेक प्रकारचे टोमणेही ऐकावे लागतात, जसे – नोकरदार महिला घर सांभाळू शकत नाहीत, नोकरदार महिला कुटुंबापेक्षा त्यांच्या करिअरला प्राधान्य देतात, किंवा नोकरदार महिला आईच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नाहीत.पण खरं तर नोकरदार महिला घरातील काम चोखपणे सांभाळतात .या महिला कोणत्याही प्रकारचे दडपण सहजपणे हाताळू शकतात .

- Advertisement -

नोकरदार महिलांचा जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. यामुळे साहजिकच त्यांना मुलांना आणि घराला हवा तसा वेळ देता येत नाही. पण असे असले तरी सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी अनेकजणी मुलांना शाळेत पाठवून, जेवण बनवून कामावर जात असतात. हे देखील जबाबदारीचे काम असून त्या ते चोखंदळपणे हाताळतात. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा त्या किचनमध्ये बिझी होतात.

यामुळे खरं तर दिवसभराच्या कामामुळे आलेला मानसिक थकवा सहन करत त्या पुन्हा संध्याकाळी त्याच ताकदीने कुटुंबाची जबाबदारीही पार पाडतात. पण त्याची दखल मात्र घेतली जात नाही. बऱ्याच घरांमध्ये पतीपत्नी संध्याकाळी कामावरून एकत्र घरी येतात. पण घरी आल्यावर पती टीव्ही पाहत रिलॅक्स होतो. तर महिला मात्र कंबऱ कसून पुन्हा किचनच्या कामाला लागते. सुट्टीच्या दिवशीही तिला आराम नसतो. तर आठवड्याभराची काम ती करत असते. पण पुरुष मात्र सुट्टीचा दिवस आराम करण्यात घालवतो. यामुळे नोकरी करणाऱ्या महिला त्यांच्या नोकरीप्रती कामाप्रती जितक्या सक्षम असतात तितक्याच सक्षमपणे त्या घरही सांभाळत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -