बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने उत्कृष्ठ अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये यशाची शिखरे गाठत आता हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंगा वाजवला आहे. या सुपरस्टार अभिनेत्रीचा आज 41 वा वाढदिवस आहे. 2000 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी प्रियंका चोप्रा आज बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रियंका अभिनयासोबतच आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. निक जोनससोबत लग्न करण्यापूर्वी प्रियांकाचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते.
असीम मर्चेंट
प्रियांकाने मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करियरची सुरुवात केली. यावेळी प्रियांका असीम मर्चेंटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा चर्चा रंगू लागल्या. परंतु बॉलिवूडमध्ये एंट्री घेतल्यानंतर प्रियांकाने ब्रेकअप केला. प्रियांका आणि असीम अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान, असीमसोबतच्या भांडणामुळे प्रियांकाने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता.
अक्षय कुमार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबतही प्रियंकाचे नाव जोडले गेले होते. या जोडीने आजवर अनेक हिट चित्रपट दिले. चाहत्यांकडूनही या जोडीला पसंती मिळाली. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी नातं असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने प्रियंकासोबत काम करण्यास अक्षयला मनाई केली होती.
शाहरुख खान
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेयरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. परंतु ही गोष्ट गौरी खानपर्यंत पोहचल्याने तिने शाहरुख खानला प्रियंका चोप्रासोबत काम करण्यास मनाई केली.
हरमन बावेजा
‘लव स्टोरी 2050’ मध्ये अभिनेता हरमन बावेजाने प्रियंकासोबत बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले. त्याचवेळी या दोघांच्या अफेअरच्याही चर्चा सुरु झाल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 5 वर्षांपर्यंत एकमेकांना डेट करत होते.
शाहिद कपूर
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरसोबतही प्रियंकाचे बरेच वर्षे अफेयर सुरु असल्याची बोलले जात होते. दरम्यान प्रियंकाच्या घरी आयटी डिपार्टमेंटची टीम दाखल झाली होती. त्यावेळी तिच्या घराचा दरवाजा शाहिद कपूरनं उघडला होता. यावरून दोघांचे अफेअर सुरु असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु झाल्या होत्या.
2018 मध्ये केलं निक जोनससोबत लग्न
अखेर 2018 मध्ये प्रियंकानो हॉलिवूड स्टार निक जोनससोबत लग्न केले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 साली जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. आता प्रियांका आणि निकला एका गोंडस मुलीचे आई-बाबा देखील आहेत.
हेही वाचा :