Saturday, April 27, 2024
घरमानिनीतुम्ही भेसळयुक्त साबुदाणा तर खात नाहीत ना?

तुम्ही भेसळयुक्त साबुदाणा तर खात नाहीत ना?

Subscribe

अलीकडे बाजारात साबुदाण्यामध्ये अनेक प्रकारची भेसळ केली जाते. अशाप्रकारचा भेसळयुक्त साबुदाणा सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर याचे घातक परिणाम होऊ शकतात.

उपवासाच्या काळात अनेकजण साबुदाण्यापासून तयार झालेले पदार्थ आवडीने खातात. अलीकडे साबुदाण्यापासून साबुदाणा वडे, साबुदाण्याचे पापड, खिचडी, खीर, पराठा यांसारखे पदार्थ तयार केले जातात. मात्र, अलीकडे बाजारात साबुदाण्यामध्ये अनेक प्रकारची भेसळ केली जाते. अशाप्रकारचा भेसळयुक्त साबुदाणा सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे उपवासात सतत साबुदाणा सेवन करण्यापूर्वी तुम्ही याची योग्य पडताळणी नक्की करून घ्या.

भेसळयुक्त साबुदाण्याची ओळख कशी करावी?

- Advertisement -

  • नकली साबुदाणा दिसण्यामध्ये चमकदार आणि पॉलिश केल्यासारखा वाटतो. मात्र खरा साबुदाण्याचा रंग थोडा फिक्कट असतो.
  • साबुदाणा तोंडात टाकल्यानंतर चावल्यावर जर करकरीत लागला तर तो भेसळयुक्त आहे.
  • जर साबुदाणा खाल्ल्यानंतर तो मऊ लागल्यास तो खरा आहे.

- Advertisement -
  • खरा साबुदाणा दातांवर थोड्यावेळा नंतर चिडकतो.
  • तसेच साबुदाणा आगीमध्ये टाकल्यानंतर तो फुलला की तो खरा आहे हे समजते.

  • परंतु जर साबुदाणा आगीमध्ये टाकल्यानंतर त्याची राख झाल्यास तो नकली आहे.
  • खरा साबुदाणा जळल्यानंतर त्यातून वास येतो. परंतु नकली साबुदाणा जळल्यानंतर त्यातून धूर निघेल.

हेही वाचा :

नवरात्रीत ट्राय करा उपवासाची लुसलुशीत इडली

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -

Manini