Receipe : उपवासासाठी बनवा टेस्टी साबुदाणा पुरी

प्रत्येकवेळी साबुदाण्याची खीर, वडे खाऊन कंटाळा येतो अशावेळी तुम्ही साबुदाण्याची पूरी देखील बनवू शकता

उपवासामध्ये साबुदाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साबुदाण्याचे सेवन केल्याने शरीरात एनर्जी येते. उपवासाच्या दरम्यान बहुतांश लोक साबुदाण्याचा वापर करतात. मात्र प्रत्येकवेळी साबुदाण्याची खीर, वडे खाऊन कंटाळा येतो अशावेळी तुम्ही साबुदाण्याची पूरी देखील बनवू शकता.

साहित्य :

 • १ कप साबुदाना (भिजलेला)
 • १ कप शिंगाड्याचे पीठ
 • २ बटाटा (उकडलेला)
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • १ चमचा हिरवी कोथिंबीर (बारीक चिरलेली)
 • उपवासाचे मीठ चवीनुसार
 • १ कप तूप/ तेल

कृती :

 • सर्वप्रथम उकडलेला बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्या.
 • आता त्यात शिंगाड्याचे पीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ मिक्स करून मळून घ्या.
 • आता हातावर पाणी लावून छोटे-छोटे गोळे करून पूरी बनवून घ्या.
 • आता गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तूप टाका.
 • तूप/तेल गरम झाल्यावर त्यात पूऱ्या सोडून त्या तळून घ्या.
 • गरमागरम साबुदाणा पूरी तयार एका वाटात काढून घ्या.
 • नारळाच्या चटणीसोबत पूरी सर्व्ह करा.

हेही वाचा :Receipe : यावेळी उपवासात साबुदाणा अप्पे नक्की ट्राय करा