Thursday, May 2, 2024
घरमानिनीजगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन यांच्यासह भारतातील 5 महिलांचा समावेश

जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन यांच्यासह भारतातील 5 महिलांचा समावेश

Subscribe

जगभरामध्ये भारताचे वर्चस्व अबाधित आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ असो किंवा अब्जाधीशांची यादी या सर्वांमध्ये भारताचे स्थान अब्बल असते. इतकंच नव्हे तर, जगातील सर्वात प्रभावशाली स्त्रियांमध्ये देखील भारताचे स्थान टिकून आहे.Forbes च्या World’s 100 Most Powerful Women 2022 या यादीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सोबत भारतातील आणखी सहा महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन 36 व्या क्रमांकावर
प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील फोर्ब्सच्या जागतिक 100 प्रभावशाली महिलांची यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये जगभरातील प्रभावशाली महिलांच्या नावाचा समावेश केला जातो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यादीत 36 व्या क्रमांकावर आहेत. 2021 मधील या यादीत निर्मला सीतारामन 37 व्या क्रमांकावर होत्या.तर 2020 मध्ये त्या 41 व्या स्थानी तर 2019 मध्ये त्या 34 क्रमांकावर होत्या. विशेष गोष्ट अशी की या यादीत सलग चार वर्ष निर्मला सीतारामन यांचे नावाचा समावेश करण्यात येतो.

- Advertisement -

भारतातील ‘या’ महिलांचाही समावेश
निर्मला सीतारामन यांच्या व्यतिरिक्त या यादीमध्ये भारतातील बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ 72 व्या स्थानी असून नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर 89 व्या स्थानी आहेत. फाल्गुनी नायर 2021 मध्ये 88 व्या क्रमांकावर होत्या. तसेच टेक चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा यांना या यादीत 53 वा क्रमांक देण्यात आला आहे . तसेच भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अधक्षा माधबी पुरी बुच या जगातील 54 व्या सर्वात शक्तिशाली महिला बनल्या आहेत. या यादीत पुढील भारतीय नाव आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) च्या अध्यक्षा सोमा मंडल 67 व्या स्थानी आहेत.

Forbes च्या World’s 100 Most Powerful Women 2022 मधील यादीत पहिल्या क्रमांकावर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन पहिल्या क्रमांकावर आहेत. Forbes च्या या यादीमध्ये 39
सीईओ आणि 10 राष्ट्रप्रमुखांचा समावेश आहे. याशिवाय 11 अशा अब्जाधीश महिलांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

2022 मध्ये सर्वाधिक सर्च झाला ‘ब्रह्मास्त्र’, यादीत टॉलिवूडच्या 5 चित्रपटांचाही समावेश

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -

Manini