घरपालघरमीरा- भाईंदर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन

मीरा- भाईंदर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन

Subscribe

या ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान ५ वॉरंटमधील आणि पाहिजे फरारी २ आरोपींना अटक करण्यात आले, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ११ केसेस करण्यात आल्या.

भाईंदर :- देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून १६ मार्च २०२४ पासून देशभरात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यातच सणासुदीचे दिवस होळी व गुढीपाडवाच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-१ यांच्याद्वारे काशिमीरा, काशिगांव, मीरारोड, नयानगर, नवघर, भाईंदर, उत्तन पोलीस ठाणे हद्दीत ऑलआऊट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती.मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, विभागीय सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले.

या ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान ५ वॉरंटमधील आणि पाहिजे फरारी २ आरोपींना अटक करण्यात आले, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ११ केसेस करण्यात आल्या. १७ इसमांवर सी.आर.पी.सी. १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच दारुबंदी कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल करण्यात आले. कोप्ता अंतर्गत १५ एन.सी. दाखल केल्या. १७ हिस्ट्रीशिटर तपासले. ८ विदेशी नागरिक तपासले. ७ तडीपार इसमांना तपासले. ५४ हॉटेल व लॉजेस तपासले. १९ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदीच्या वेळी ३९७ संशयित वाहने तपासण्यात आली असून मोटार वाहन कायद्यान्वये १४९ केसेस करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -