Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyHoli 2024 : होळीचा रंग काढण्यासाठी 'या' टीप्स

Holi 2024 : होळीचा रंग काढण्यासाठी ‘या’ टीप्स

Subscribe

बुरा ना मानो होली है! असे म्हणत तुम्हाला कोणी रंग लावायला आले असता चेहरा, त्वचा, केस खराब होतील याचा विचार करून तुम्हीही त्या व्यक्तीला अडवता का? स्वतःची इच्छा असूनही फक्त त्वचेची काळजी तुम्हाला आनंद साजरा करण्यापासून थांबवतेय का? तर असे करण्याची काहीच गरज नाही, आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील होळीच्या रंगापासून सुटका मिळवू शकता.

तेल

होळीच्या वेळी हा रंग कायमस्वरूपी झाला असेल, तर या हट्टी रंगापासून सुटका करण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता. होळीचा कायमचा रंग काढून टाकण्यासाठी आंघोळीपूर्वी ज्या ठिकाणी कायमचा रंग येतो त्या ठिकाणी तेलाचा वापर करावा आणि अशा प्रकारे आंघोळीपूर्वी तेल लावल्याने कायमचा रंग लवकर निघून जाईल. तेलामध्ये तुम्ही नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह तेल वापरू शकता.

- Advertisement -

काकडी

होळीच्या वेळी लावलेला हट्टी रंगही काकडीच्या मदतीने काढता येतो. हट्टी रंग काढण्यासाठी तुम्ही काकडीचा रस वापरू शकता, तर काकडीला गुलाब पाण्यात मिसळून वापरल्याने चेहऱ्यावरील रंगही निघून जाईल.

मुलतानी माती

रंग काढून झाल्यावर चेहऱ्याला मुलतानी मातीचा फेस पॅक लावा, ज्यामुळे त्वचेचे आत शिरलेले रंगाचे कण सुद्धा निघून जातील.

- Advertisement -

दुधात कच्च्या पपईचा गर

होळीचे रंग काढण्यासाठी तुम्ही हा उपायही करू शकता. यासाठी दुधात कच्च्या पपईचा गर घाला. त्यात मुलतानी माती आणि बदामाचे तेल घालून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहार स्वच्छ करा.

या गोष्टी वापरू नका

  • घन रंग काढण्यासाठी गरम पाणी वापरू नका. जर तुम्ही गरम पाणी वापरत असाल तर त्याचा रंग फिकट होण्याऐवजी गडद होऊ शकतो. यासाठी गरम पाणी वापरणे टाळावे.
  • जर तुम्ही स्क्रबसोबत कोणताही कठोर साबण वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकते. होळीचे रंग काढताना गरम पाणी आणि कडक साबण वापरणे टाळावे.

केसातून होळीचा रंग कसा काढावा?

  • केसांवर शाम्पू लावण्याआधी कोमट पाण्याने भिजवून शक्य तितका रंग काढून टाका.
  • भिजवलेले मेथीचे दाणे आणि दह्याचा हेअर पॅक किंवा अंड्याचा केवळ पिवळा भाग केसांना लावून अर्धा तासानंतर केस माईल्ड शॅम्पूने धुवा.
  • डीप कंडीशनींग साठी मध आणि ऑलिव्ह ऑईल केसांना लावून आंघोळ करा.
  • होळीचा रंग काढताना चिंता करायची नसेल तर होळी खेळायला जाण्यापूर्वीच शरीराची योग्य ती काळजी घ्या, यासाठी त्वचा, चेहरा जास्तीत जास्त हायड्रेटेड असेल असे निश्चित करून घ्या.
- Advertisment -

Manini