Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : ओठांवर मुरूमं येत असतील तर करा हे सोपे उपाय

Beauty Tips : ओठांवर मुरूमं येत असतील तर करा हे सोपे उपाय

Subscribe

मुरूमं ही नेहमीच चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात. ज्याप्रमाणे चेहऱ्यावर मुरूमं येतात. त्याचप्रमाणे तुमच्या ओठांवरही अर्थात लिप लाईनवरही मुरूमं होऊ शकतात. पण ओठांवर आलेल्या मुरूमामुळे खूप त्रासही होतो.ओठांवरील मुरूमं काढून टाकण्यासाठी नैसर्गिक आणि सोपे उपाय घरच्या घरी करता येतात. पण उपाय करण्यापूर्वी नक्की कोणत्या कारणामुळे मुरूम आले आहे हे जाणून घ्या. ओठांवर सतत मुरूमं येत असतील तर त्यावर घरगुती उपाय काय आहेत जाणून घेऊयात.

चेहऱ्याची स्वच्छता

दिवसातून दोन वेळा ताज्या पाण्यानं कमीत कमी 2 वेळा आपला चेहरा स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यासाठी फेसवॉशचा वापर करा आणि चेहरा धुवून घ्या. स्किन टाईपनुसार नाईट क्रिमचा वापर करा.

- Advertisement -

काही सवयी बदला

आपल्याला अनेक सवयी असतात. जसं की, सतत चेहरा किंवा ओठांना हात लावणं. काम करताना आपण अनेक वस्तूंना स्पर्श करतो. अशात तुम्ही चेहऱ्याला किंवा ओठांना हात लावला तर इंफेक्शन किंवा पिंपल्स येऊ शकतात.

लिंबाचा रस

लिंबाचा रस हे एक प्रभावी अँटीबॅक्टेरियल आहे ज्याचा उपयोग करणे अत्यंत सुरक्षित आहे. अनेक अभ्यासावरून सिद्ध झाले आहे की, लिंबाचा रस हा मुरूमांवर एक प्रभावी क्लिंन्झर आहे. त्वचेमधील तेल आणि घाण दोन्ही बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग होतो. लिंबाचा रस ओठांवर लावा, नंतर ओठ पाण्याने स्वच्छ धुवा. तसेच ओठ पुसायला मऊ मुलायम टॉवेलचा वापर करा.

- Advertisement -

वाफ

चेहऱ्याला वाफ देऊन तुम्ही पोर्स बंद करू शकता आणि घाण हटवू शकता. हे अत्यंत सौम्य़ शुद्ध स्वरूपात कार्य करते आणि रक्तप्रवाह वाढविण्यासही फायदेशीर ठरते. वाफ घेऊन झाल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. वाफेमुळे पोर्समधील असणारी घाण निघून जाण्यास मदत मिळते. तसंच यातील अशुद्ध तेलही निघून जाते.

बर्फ

लाल आणि सुजलेल्या मुरूमांवर तुम्ही आईस पॅक लावल्यानेही फायदा होतो. एका मुलायम कपड्यामध्ये अथवा टिश्यूमध्ये काही बर्फाचे तुकडे ठेवा आणि ओठाला लावा. यामुळे त्वचेमध्ये रक्तप्रवाह हळूवार होतो. त्यामुळे सूज कमी होते आणि लालपणाही कमी होण्यास मदत मिळतो.

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांचादेखील ओठांवरील मुरूमांवर उपयोग करून घेता येतो. हा अत्यंत गुणकारी आणि आयुर्वेदिक उपाय आहे. सल्फरचा उपयोग आणि टेट्रासायक्लिनच्या एकत्र कॉम्बिनेशनमुळे मुरूमांवर त्वरीत आणि लवकर उपाय करता येतो. तुम्हाला एका कापसाचा सहाय्याने तुळशीच्या पानाचा रस ओठांवर आलेल्या मुरूमांवर लावायचा. काही वेळ ठेऊन स्वच्छ चेहरा पाण्याने धुवा. याचा परिणाम एक दोन दिवसातच दिसून येईल.

अशी घ्या ओठांची काळजी

  • या नैसर्गिक उपायांशिवाय सूज थांबविणेदेखील महत्त्वाचे आहे. त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काळजी घ्यायला हवी.
  • मुरूमं आलेल्या ठिकाणी ग्लॉस, लिप बाम अथवा अधिक मेकअप करणे थांबवा. या उत्पादनांमुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते
  • ओठ नियमित चांगले स्वच्छ करा. नाश्ता आणि जेवण झाल्यावर दातांसह ओठही स्वच्छ करणे गरजेचे आहे. एका स्वच्छ टॉवेलने व्यवस्थित ओठांना स्वच्छ करा
  • मुरूमांपासून सुटका मिळण्यासाठी स्क्रबचा वापर करू नका. यामुळे अधिक त्रास होईल
  • ओठांना सतत हात लाऊ नका. यामुळे अधिक बॅक्टेरिया आणि घाण जमा होते
  • ओठांवर मुरूमं आल्यावर ते फोडण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे आसपासची त्वचा अधिक दूषित होते आणि त्यामुळे अजून मुरूमं येण्याची शक्यता असते.
- Advertisment -

Manini