घरदेश-विदेशECI : दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे..., निवडणूक आयोगाच्या...

ECI : दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे…, निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्षांना कानपिचक्या

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी केली. त्यामुळे आता निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळी अधिक रंगण्यास सुरुवात होईल. निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. अशा परिस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी, सर्वच राजकीय पक्षांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राजकीय स्तर घसरू न देण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे, आयुक्त राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांना कानपिचक्या देताना शायरी, दोह्याचा वापर केला.

हेही वाचा – Lok Sabha : सलग तिसऱ्यांदा मतदारांचा आशीर्वाद मिळेल, पंतप्रधान मोदींना विश्वास

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांनाही काही पथ्य पाळण्यास सांगितले. निवडणुकीदरम्यान राजकारणाचा स्तर घसरणार नाही, याची काळजी घ्यावी. मर्यादांचे पालन करावे. वैयक्तिक पातळीवर हल्ले होता कामा नये. सध्या तर, लगेचच मित्र आणि शत्रू बनण्याचा प्रकार जरा जास्तच सुरू आहे, असा राजकीय पक्षांना चिमटा काढत राजीव कुमार यांनी प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा शेर ऐकवला –

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों

- Advertisement -

त्याचबरोबर, राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर टाळण्याची सूचनाही आयुक्तांनी केली. मुखातून जे काही बाहेर पडते, ते कायमचे डिजिटली रेकॉर्ड होते आणि पुन्हा पुन्हा चालवले जाते. म्हणून कृपया अशा आक्षेपार्ह डिजिटल आठवणी तयार होणार नाहीत, याकडे लक्ष द्या. एकदा भांडण, वादविवाद झाले की स्नेहबंध तुटतात आणि जेव्हा ते तुटतात तेव्हा खूप कठीण परिस्थिती निर्माण होते, असे सांगत राजीव कुमार यांनी रहीमचा दोहा ऐकवला…

हेही वाचा – Election Commission : मतदारांना आमीष देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचा इशारा

रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो छिटकाय,
टूटे से फिर न मिले, मिले गाँठ परिजाय…

पत्रकार परिषदेत ईव्हीएमसंबधी प्रश्न विचारल्यावर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा आग्रह धरणाऱ्या विरोधी पक्षांना सुनावताना राजीव कुमार यांनी स्वत: लिहिलेल्या कवितेच्या ओळी ऐकवल्या. हे मी नव्हे, तर, ईव्हीएम म्हणत असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. ते म्हणाले –

अधूरी हसरतों का इल्जाम, हर बार हम पर लगाना ठीक नहीं।
वफा खुद से नहीं होती, खता ईवीएम की कहते हो।
गोया परिणाम आता है, तो उस पर कायम भी नहीं रहते।

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : देशात 7, तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान; लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -