Saturday, April 20, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : कांद्याचा रस आहे त्वचा आणि नखांसाठीही फायदेशीर

Beauty Tips : कांद्याचा रस आहे त्वचा आणि नखांसाठीही फायदेशीर

Subscribe

बहुतेक लोक केसांसाठी कांद्याचा रस वापरतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का की, त्वचेसाठी देखील कांदा सर्वोत्तम मानला जातो. त्वचेच्या अनेक समस्या कांद्याने दूर केल्या जाऊ शकतात. जाणून घ्या कांद्याचा रस कोणत्या समस्या दूर करण्यास मदत करतो.

कांद्याचा रस त्वचेवर कसा वापरावा

  • अनेक महिलांसाठी पुरळ ही एक सामान्य समस्या आहे. हार्मोन्समधील बदल आणि कधीकधी PCOS, थायरॉईडच्या समस्यांमुळे मुरुमे होऊ शकतात. जर तुम्ही यासाठी काही घरगुती उपाय शोधत असाल तर कांद्याचा रस तुमच्यासाठी उत्तम काम करू शकतो.
  • मुरुमांच्या डागांवर कांद्याचा वापर करण्यासाठी, कांद्याचा एक छोटा तुकडा कापून घ्या, हलका किसून घ्या आणि किसलेला कांदा तुमच्या डागांवर किंवा पिंपल्स आलेल्या भागावर स्वच्छ बोटांनी घासून घ्या. कांद्याच्या वासापासून सुटका होण्यासाठी नंतर हात साबणाने धुवा.
  • कांद्याचा अर्क कोणत्याही डागांवर उपचार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे कांद्याचा अर्क कोरफड जेलमध्ये मिसळल्यास त्याचा परिणाम लवकर आणि चांगला दिसून येतो. यासाठी, 1 चमचा पिळून काढलेल्या कांद्याचा रस,1 चमचा कोरफड जेलमध्ये मिसळा आणि हे जेल डागांवर लावा. लावल्यानंतर 10 मिनिटे तसंच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि मॉइश्चराइझर लावा.
  • कांद्याचा वापर त्वचेवर येणाऱ्या चामखीळ दूर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. यासाठी कांद्याची पेस्ट बनवून त्यात तुळशीच्या पानांचा रस मिसळा. आता ही पेस्ट चामड्यांवर लावा.

नखे मजबूत करण्यासाठी

सल्फरने भरपूर असलेला कांदा तुमच्या नखांचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. आपली नखे मजबूत आणि पोषण करण्यासाठी कांद्याचा रस आणि लिंबाचा रस यांच्या मिश्रणात भिजवा. यामुळे तुमच्या नखांचा पिवळसरपणा दूर होईल आणि त्यांना वेगळी चमक मिळेल.

- Advertisment -

Manini