घरक्राइमPimpri Chincwad : महापालिका शाळेत तिसऱ्या मजल्यावरुन पडून विद्यार्थ्याचा मृ्त्यू; वडिलांची चौकशीची...

Pimpri Chincwad : महापालिका शाळेत तिसऱ्या मजल्यावरुन पडून विद्यार्थ्याचा मृ्त्यू; वडिलांची चौकशीची मागणी

Subscribe

पुणे – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही घटना घडली. मृत मुलाचे नाव सार्थक कांबळे असं होतं. काळेवाडीत राहणारा सार्थक पिंपरी चिंचवडमधील हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता.

मित्राने सांगितलं प्रत्यक्ष काय घडलं..
आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास आठव्या वर्गात शिकत असलेला सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. रेलिंगवर घसरगुंडी खेळणं धोकादायक आहे, पडला तुला लागेल असं त्याच्या मित्राने त्याला सांगितलं होतं. मात्र सार्थकने कोणाचंही ऐकलं नाही, तो खेळण्यात मग्न होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो तळ मजल्यावर जाऊन पडला, अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या अपघातात सार्थकच्या डोक्याला जोरदार मार लागला. त्याला तातडीनं रुग्णालयात हलविण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीसांनी दिली आहे.

- Advertisement -

शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा मुलगा मला परत द्या. अशी मागणी सार्थकच्या वडिलांनी केली. तर शाळेत घडलेला घात आहे अपघात आहे याची चौकशी पिंपरी चिंचवड पालिकेकडून केली जाणार आहे.

सार्थक याच वर्षी पिंपरीतील शाळेत शिक्षणासाठी आला होता. यापूर्वी तो काळेवाडीतील शाळेत शिकायचा. माझा मुलगा मला आहे तसा परत द्या, असा आक्रोश सार्थकच्या वडिलांनी केला. ते म्हणाले की, माझा मुलगा सकाळी मला सांगून शाळेत आला. शाळेत येताना काळजी घ्या आणि नीट कामावर जा, असं म्हणाला. मात्र काही वेळातच मला फोन आला आणि दवाखान्यात यायला सांगितलं. सार्थकला दुखापत झाल्याचं सांगितलं. मात्र सार्थकचा मृत्यू झाला होता. शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा मुलगा जसा सकाळी शाळेत आला होता तसाच परत करा, अशी मागणी वडिलांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मेहुल पारिखच्या अटकेची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -