घरमहाराष्ट्रJayant Patil: ...तर बेरोजगारांना संधी मिळणार नाही; सरकारच्या 'या' निर्णयाला जयंत...

Jayant Patil: …तर बेरोजगारांना संधी मिळणार नाही; सरकारच्या ‘या’ निर्णयाला जयंत पाटलांचा विरोध

Subscribe

महाराष्ट्र शासकीय अध‍िकारी/कर्मचारी यांचे सेवान‍िवृत्तीचे वय 58 वरुन 60 पर्यंत वाढवण्याच्या विचाराधीन आहे. परंतु या निर्णयाला आपला विरोध आहे. सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली तर बेरोजगार होतकरू उमेदवारांना संधी मिळणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं म्हणणं आहे.

मुंबई: महाराष्ट्र शासकीय अध‍िकारी/कर्मचारी यांचे सेवान‍िवृत्तीचे वय 58 वरुन 60 पर्यंत वाढवण्याच्या विचाराधीन आहे. परंतु या निर्णयाला आपला विरोध आहे. सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली तर बेरोजगार होतकरू उमेदवारांना संधी मिळणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वयोमर्यादा वाढवली जाऊ नये, अशी मागणी करत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. (Jayant Patil then unemployed prospective candidates will not get a chance Jayant Patil opposition to the this decision of the government)

जयंत पाटलांचं ट्वीट

जयंत पाटील यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्रही पोस्ट केलं आहे.  महाराष्ट्र शासन, शासकीय अध‍िकारी/कर्मचारी यांचे सेवान‍िवृत्तीचे वय 58 वरुन 60 पर्यंत वाढवण्याच्या विचाराधीन आहे. मात्र आमचा या निर्णयाला विरोध आहे. सेवान‍िवृत्तीची वयोमर्यादा वाढवली जाऊ नये अशी आमची मागणी आहे. याबाबत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अवगत केलं, असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये  म्हटलं आहे.

- Advertisement -

शासनाने अशाप्रकारे सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवल्यास आगामी दोन वर्षांत शासन सेवेतून न‍िवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण नगण्य होईल. पर्यायाने शासन सेवेतील पदे र‍िक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकरू उमेदवारांना शासन सेवेत प्रवेश करण्याची संधी मिळणार नाही. तसेच ज्यांच्याकडे शासन सेवेत प्रवेश करण्यासाठी अंत‍िम 2 संधी असतील, असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादेमुळे अपात्र होतील आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल, असंही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

..तर मोठ्या प्रमाणात आंदोलने होतील

या सर्वच गोष्टींमुळे राज्यातील तरुण वर्गात न‍िराशा न‍िर्माण होऊन त्यांच्यामध्ये असंतोष न‍िर्माण होईल व मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने आम्ही दिलेल्या पत्राची दखल घेऊन सेवान‍िवृत्ती वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णय घेऊ नये, अशी विनंती त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Pimpri Chincwad : महापालिका शाळेत तिसऱ्या मजल्यावरुन पडून विद्यार्थ्याचा मृ्त्यू; वडिलांची चौकशीची मागणी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -