घरदेश-विदेशCongress: बँक खाती गोठवण्याचा कट, सरकारला आम्हाला लाचार बनवायचंय; काँग्रेसचा हल्ला

Congress: बँक खाती गोठवण्याचा कट, सरकारला आम्हाला लाचार बनवायचंय; काँग्रेसचा हल्ला

Subscribe

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इलेक्ट्रोल बॉन्डवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी गुरुवारी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इलेक्ट्रोल बॉन्डवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. (Congress Conspiracy to freeze bank accounts government wants to make us helpless Congress attack on Modi government)

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक आहेत. सत्तेत असलेल्यांची संसाधनांवर मक्तेदारी असावी, माध्यमांवर त्यांची मक्तेदारी असावी, असे होऊ नये. निवडणूक आयोग, ईडीसारख्या घटनात्मक आणि न्यायिक संस्थांवर सत्ताधारी पक्षाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असावे, असे होऊ नये.

- Advertisement -

खर्गे म्हणाले की, दुर्दैवाने नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर इलेक्ट्रोल बॉन्डबाबत जे तथ्य समोर आले आहे ते चिंताजनक आणि लज्जास्पद आहे. यामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. गेल्या 70 वर्षांत आपल्या देशात निर्माण झालेल्या निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खर्गे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने जे निवडणूक देणगी बाँड बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवले होते. या अंतर्गत सध्याच्या सत्ताधारी पक्षाने आपल्या खात्यात हजारो कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे, तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्षाचे बँक खाते षड्यंत्र रचून गोठवण्यात आले आहे, जेणेकरून काँग्रेस निवडणूक लढवू शकणार नाही. सत्ताधारी पक्षाचा हा धोकादायक खेळ आहे, त्याचे दूरगामी परिणाम होतील, कारण लोकशाही वाचवायची असेल तर समानता असली पाहिजे.

- Advertisement -

सत्ताधाऱ्यांकडून धोकादायक खेळ खेळला जात असल्याचे खर्गे म्हणाले. कोणत्याही राजकीय पक्षाला लाचार करून निवडणूक लढवण्यात अडथळे निर्माण करणे, याला निष्पक्ष निवडणूक म्हणता येणार नाही, हे स्पष्ट होते. इलेक्ट्रोल बॉन्डमधून भाजपला 56 टक्के तर काँग्रेसला केवळ 11 टक्के रक्कम मिळाल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान काँग्रेसला अपंग करण्याचा प्रयत्न करताहेत

यादरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. भाजपला इलेक्टोरल बाँड्सचा खूप फायदा झाला आहे. पंतप्रधान काँग्रेसला अपंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे.

‘निवडणूक लढवायला पैसे नाहीत’

यावेळी काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा निधी वापरण्यास सक्षम नाही. आम्ही प्रसिद्धीसाठी पैसे खर्च करू शकत नाही. ही कसली लोकशाही? आमच्यावरील 30 ते 35 जुन्या केसेस आता उघडून ते आम्हाला पैसे वापरू देत नाहीत.

उमेदवारांना देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, असे माकन म्हणाले. आमच्याकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत. आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला जारी केलेली नवीन नोटीस 1994-1995 शी संबंधित आहेत. ही नोटीस 14 मार्च रोजी देण्यात आली होती. ही बाब 30 वर्षे जुनी असल्याने, यावेळी ही नोटीस का बजावण्यात आली आहे. हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे.

(हेही वाचा:  Vasant More : निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी…, वसंत मोरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -