घरमनोरंजन'उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरीचं निधन

‘उडान’ फेम अभिनेत्री कविता चौधरीचं निधन

Subscribe

‘उडान’ फेम अभिनेत्री कविता चौधरी (Kavita Chaudhary) यांचे वयाच्या 67 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘उडान’ मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह ही भूमिका त्यांनी साकारली होती. कविता यांच्या निधनाच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. तसेच सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

कविता चौधरी गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या. मागील तीन ते चार दिवसांपासून अमृतसरमधील पार्वती देवी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, 16 फेब्रुवारी रोजी शिवपुरी अमृतसरमध्ये अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

कविता ही पोलीस अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य यांची धाकटी बहीण होती. याशिवाय सर्फच्या जाहिरातीत काम करून कविता प्रसिद्ध झाली. 1980 च्या उत्तरार्धात प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीत तिने गृहिणी ललिता जीची भूमिका साकारली होती. कविता चौधरी यांच्या निधनाने मनोरंजन जगताची मोठी हानी झाली आहे. कविता चौधरी यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आपल्या अभिनयाने, भूमिकांमधून घराघरात पोहोचल्या कविता यांच्या जाण्याने कुटुंबीयांसह, मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

‘उडान’ मालिकेने दिली होती ओळख
1989 मध्ये प्रसारित झालेल्या उडान या कार्यक्रमामध्ये कविता यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह यांची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. हा कार्यक्रम त्यांची बहिण कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या जीवनावर आधारित होता. ज्या किरण बेदी यांच्यानंतर दुसऱ्या आयपीएस अधिकारी होत्या. चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्यांचे फारसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे कविता यांचा उडान हा कार्यक्रम महिला सक्षमीकरणाचे उदाहरण बनला. याशिवाय कविताने योर ऑनर आणि आयपीएस डायरीसारखे शो देखील केले होते. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीचं गाजली होती.

- Advertisement -

1980 आणि 1990 च्या दशकात प्रसिद्ध सर्फ जाहिरातींमध्ये ललिताची भूमिका साकारण्यासाठीही कविता यांना ओळखले जाते. या जाहिरातींमध्ये त्यांना एका गृहिणीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या पात्राविषयी बोलताना कविता यांनी द क्विंटला सांगितले की,ललिता जी एक नॉनसेन्स कॅरेक्टर होती, माझं व्यक्तिमत्व तसं अजिबात नाही.परंतु त्यांना असे वाटले की मी कदाचित त्याचा टोन समजू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -