Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealth'ब्रोकन हार्ट सिंड्रोम'ची लक्षणे आणि उपाय

‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ची लक्षणे आणि उपाय

Subscribe

आपण दुःखद घटनेनंतर आणि प्रेम भंगानंतर साधारण ब्रोकन हार्ट असा शब्द वापरतो. पण, ब्रोकन हार्ट केवळ भावना नसून हा गंभीर आजार सुद्धा असू शकतो. याला ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ किंवा ‘टाकोस्तुबो कार्डियोमायोपॅथी’ असे म्हणतात. ब्रोकन हार्ट सिंड्रोममध्ये हृदयाचा एक भाग तात्पुरता कमकुवत होतो. ज्याने हृदयाचे पंपिंग कमी होते. एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू, नातेसंबंध तुटणे किंवा गंभीर आजाराचे निदान यासारख्या भावनिक तणावानंतर हे घडू शकते.

‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ची लक्षणे – 
1. श्वास घेण्यास अडचण
2. घाम येणे.
3. चक्कर येणे
4. छातीत अचानक तीव्र वेदना जाणवणे
5. अचानक बेशुद्ध पडणे

- Advertisement -

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे हार्ट अटॅकसारखी असू शकतात. पण, या दोघांमध्ये बरेच फरक आहेत. हार्ट अटॅकमध्ये शिरांमध्ये ब्लॉकेज असते तर हार्ट ब्रोकन सिंड्रोममध्ये असे होत नाही. याशिवाय हार्ट ब्रोकन सिंड्रोम काही आठवडे किंवा काही महिन्यात बरा होऊ शकतो. तर हार्ट अटॅकचे गंभीर परिणाम जाणवतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य निदान करून घ्यावे.

ब्रोकन हार्ट सिंड्रोमवर उपाय –

- Advertisement -

1.स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट करणे
2. दिवसातील काही वेळ ध्यान करणे
3. आराम करणे गरजेचे
4. जवळच्या व्यक्तीसोबत बोलून मन हलके करू शकता

ब्रोकन हार्ट सिंड्रोम कसे टाळाल – ब्रोकन हार्ट सिंड्रोम टाळण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही. पण, हेल्दी लाइफस्टाइल आणि स्ट्रेस मॅनेजमेंट केल्याने याचा धोका कमी केला जाऊ शकतो. यात तुम्हाला आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणं गरजेचे आहे. तुम्हाला कोणताही भावनिक स्ट्रेस जाणवत असेल तर तुम्ही बोलायला हवे. यासाठी जवळच्या व्यक्तीशी किंवा तुम्ही मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी सुद्धा बोलू शकता.

तुमच्या भावना दाबून ठेवल्याने ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’चा धोका वाढू शकतो. हा एक गंभीर आजार असला तरी तो बरा होऊ शकते. वेळेवर निदान आणि योग्य उपचाराने तुम्ही यावर मात करू शकता.

 

 


हेही वाचा ; बॉडी डिटॉक्स करणे म्हणजे काय ?

- Advertisment -

Manini