घरमनोरंजनRituraj Singh Passes Away: हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता ऋतुराज सिंह यांचं निधन

Rituraj Singh Passes Away: हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता ऋतुराज सिंह यांचं निधन

Subscribe

अमित बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज सिंह यांना स्वादुपिंडाशी संबंधित समस्या देखील होती. अभिनेता ऋतुराजने अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, दिया और बाती हम, हिटलर दीदी, सीआयडी, श्शश कोई है आणि 90 च्या दशकातील मालिका बनेगी अपनी बात आणि तोल मोल के बोल यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

मुंबई : लहान पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता ऋतुराज सिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. ऋतुराज सिंह याचा मित्र अमित बहल यांनी एका मीडियाला दिलेल्या माहितीनंतर निधनाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला. (Rituraj Singh Passes Away Actor Rituraj Singh passed away due to heart attack)

अमित बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज सिंह यांना स्वादुपिंडाशी संबंधित समस्या देखील होती. अभिनेता ऋतुराजने अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, दिया और बाती हम, हिटलर दीदी, सीआयडी, श्शश कोई है आणि 90 च्या दशकातील मालिका बनेगी अपनी बात आणि तोल मोल के बोल यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ऋतुराज सिंह याने शाहरुख खानसोबत डर आणि बाजीगरमध्येही काम केले आहे.

- Advertisement -

स्वादुपिंडाच्या त्रासामुळे ऋतुराज यांचं निधन

ऋतुराज सिंह याचा मित्र अमित बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. काही काळापूर्वी ते स्वादुपिंडाच्या उपचारासाठी रुग्णालयात गेले होते. तेथून परतल्यानंतर ते घरीच असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली.

हेही वाचा : Vijay Wadettiwar : राज्य सरकार भांबावलेले, प्रथा आणि परंपरा मोडीत काढल्या; वडेट्टीवारांची टीका

- Advertisement -

चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

ऋतुराज यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. ऋतुराज सिंह यांनी आशिकी, मेरी आवाज ही पहला है, तडप, बद्रीनाथ की दुल्हनिया, सत्यमेव जयते यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहली जात आहे. ऋतुराज सिंह याच्या एका चाहत्याने लिहिले की, ऋतुराज सिंह हा खूप चांगला अभिनेता होता. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : “महाराष्ट्राला मिळालेले गृहमंत्री कमजोर आणि…”, फडणवीसांना राऊतांचा टोला

राजस्थान ते मुंबई असा प्रवास

अभिनेता ऋतुराज सिंह यांचं संपूर्ण नाव ऋतुराज सिंह चंद्रावत सिसोदिया. त्यांचा जन्म कोटा राजस्थान येथे झाला. वयाच्या 12 व्या वर्षी ते मुंबईत आले. काही वर्ष त्यांनी दिल्ली येथे थिएटरमध्ये काम केलं. यानंतर त्यांनी मालिकांमध्ये भूमिका साकारायला सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -