घरमनोरंजनShreyas Talpade : हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसने स्वत:च दिली हेल्थ अपडेट

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसने स्वत:च दिली हेल्थ अपडेट

Subscribe

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करून तो घरी आला. शूटिंग आटोपल्यानंतर जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याला छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयसला अद्यापही डिस्चार्च मिळालेला नाही. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसने स्वत: हेल्थ अपडेट दिली आहे.

श्रेयस तळपदेने एका दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “तुमचा पाठिंबा आणि प्रार्थनेसाठी खूप खूप आभार. माझी प्रकृती पूर्वीपेक्षा ठिक आहे. अजूनही रूग्णालायत माझ्या उपचार सुरू आहेत”.

- Advertisement -

श्रेयसला 14 डिसेंबर संध्याकाळी मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयस तळपदे त्याच्या नवीन चित्रपट “वेलकम टू द जंगल” (Welcome To The Jungle Movie) चे शूटिंग करत होते. शूटिंग आटोपल्यानंतर जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याला छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. सध्या अँजिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान 15 डिसेंबरला श्रेयस तळपदेची पत्नी दिप्ती तळपदेने श्रेयसच्या तब्येतीबाती सोशल मीडियावर एक पोस्ट करत माहिती दिली होती. दिप्ती सोशल मीडिया पोस्ट करत त्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, ‘माझ्या पतीने नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्या सर्वांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता त्याची प्रकृती स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आम्ही काही गोष्टी खासगी ठेवू इच्छितो, त्याचा तुम्ही आदर करावा अशी मी विनंती करते. तुमची भक्कम पाठिंबा हा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे,’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -