Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthपोटात गडबड असल्याची ही आहेत 5 लक्षणं, करू नका दुर्लक्ष

पोटात गडबड असल्याची ही आहेत 5 लक्षणं, करू नका दुर्लक्ष

Subscribe

व्यक्तीच्या मनावर राज्य करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, असे म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात केवळ मनाचाच नाही तर संपूर्ण निरोगी आरोग्याचा मार्ग हा पोटातूनच जातो. जर आपण सकस अन्न खाल्ले तर आपले आरोग्य निरोगी राहते. पण, आजकालच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे सकस आहाराऐवजी आपण जंक फूडकडे जास्त वळतो आणि त्याचा सर्वाधिक फटका हा पोटाला बसतो.

ज्या लोकांना पोटाशी संबंधित गंभीर समस्या आहेत ते कोणत्याही काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही किंवा त्यांचा मूड चांगला राहत नाही. अशा व्यक्तींची सतत चिडचिड होते. त्यामुळे शरीराची पचनक्रिया व्यवस्थित असणे आवश्यक असते. पोटाचा त्रास वाढला की, संपूर्ण शरीरात समस्या वाढतात. पोटाचा थेट संबंध मेंदूशी असतो. या कारणामुळे केवळ पोटालाच नाही तर शरीराच्या इतर अनेक भागांनाही त्रास होतो. पोटात जेव्हा कधीही काही गडबड असते तेव्हा काही लक्षणे दिसतात.

- Advertisement -

पोटात गडबड असल्याची लक्षणं –

  • पोटाच्या समस्यांमध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे गॅस आणि पोट फुगणे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोटात गॅस, पोट दुखणे, अपचन आदी समस्या जाणवत असतील तर पोटात चांगल्या बॅक्टरीयाची कमतरता आहे किंवा ते नीट काम करत नाही असे समजा. जेवल्यानंतर अनेकदा पोट फुगले आणि गॅसची समस्या जाणवत असेल तर याचा अर्थ असा की, बॅक्टरीया योग्यरीत्या अन्न तोडू शकत नाही. हे एक धोकादायक लक्षण आहे.
  • जर तुम्हाला पोटाची समस्या जाणवत असेल तर त्याचा तुमच्या वजनावर परिणाम होतो. कधी कधी वजन खूप वेगाने वाढते तर कधीकधी अचानक कमी होते. जेव्हा तुमचे पोट निरोगी असते तेव्हा अन्नाचे पचन व्यवस्थित होते. पण, जर ही क्रिया व्यवस्थित न झाल्यास पचन योग्यरीत्या होत नाही. ज्यामुळे पोषक तत्त्वे योग्यरीत्या मिळत नाहीत. त्यामुळे वजन कमी होणे आणि वाढणे अशा पोटाच्या संबधीत समस्या जाणवतात.
  • जेव्हा कधीही तुम्ही रिफाईंड शुगर किंवा जास्त तेल आणि लोणी असलेल्या गोष्टी खाल्यात तर त्वचेमध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. 2021 च्या अभ्यासानुसार, अन्न पोटातील बॅक्टरीयाचे संतुलन बिघडवते. त्यामुळे पिंपल्स, सोरायसिस आणि केसांमध्ये कोंडा अशा समस्या जाणवतात.

- Advertisement -
  • तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोटाची समस्या खोलवर असेल तर त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. त्यामुळे जेव्ही कधीही तुमच्या पोटात खूप गॅस किंवा पोट फुगण्याच समस्या जाणवते तेव्हा तुम्हा मुदक हेरंब होतो. पोटाच्या समस्यांमुळे मानसिक स्वास्थही बिघडते. तुमची चिडचिड वाढते आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित व्हायला अडचणी निर्माण होतात.
  • पोटात पचनाशी संबंधित अनेक आजार आहेत जे शरीरात जुनाट होतात. यामध्ये GI, कोलायटिस, सेलियाक, बद्धकोष्ठता, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, पेरिअनल अबसेस, कोलन पॉलीप, क्रॉन्स डिसीज यासारख्या पॉट आणि पचनाशी संबंधित आजारांचा समावेश आहे.

टाळण्यासाठी उपाय –

  • पोटाशी संबंधित गंभीर आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा.
  • खाण्याच्या सवयी निरोगी करा. याचा अर्थ दररोज हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा.
  • पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
  • आनंदी राहा.
  • सिगारेट, दारूचे सेवन करू नका.
  • प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा.

 

 

 

 


हेही वाचा : सकाळची ही लक्षणे म्हणजे आजाराचे संकेत

 

- Advertisment -

Manini