घरठाणेBMC : मुंबई पालिकेत भूषण गगराणी, ठाण्यात सौरभ राव आणि नवी मुंबईत...

BMC : मुंबई पालिकेत भूषण गगराणी, ठाण्यात सौरभ राव आणि नवी मुंबईत कैलास शिंदेंची आयुक्तपदी नियुक्ती

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी तर, कैलास शिंदे यांची नवी नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली करण्याचे निर्देश दिले होतो. त्यानुसार, त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (20 मार्च) नव्या महापालिका आयुक्तांची नियक्ती करण्यात आली आहे. (Bhushan Gagrani appointed as Mumbai Municipal Commissioner)

भूषण गगराणी हे 1990 च्या बॅचचे असून सध्या ते मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव होते. तसेच, कैलास शिंदे हे सध्या सिडकोमध्ये सह संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच, सौरभ राव हे यापूर्वी राज्याच्या सहकार आयुक्तपदी कार्यरत होते.

- Advertisement -

इकबाल सिंह चहल यांना सध्यतरी नवीन पदभार देण्यात आलेला नसून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही वेटींगवरच ठेवण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी भूषण गगराणी, असीम गुप्ता, मिलिंद म्हैसकर या तीन IAS अधिकाऱ्यांची नावे सुचवली होती. त्यापैकी भूषण गगराणी यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले.

- Advertisement -

हेही वाचा – Party Name Symbol : निर्णय मतदारांची थट्टा करणारा, पक्ष फुटीला प्रोत्साहन देणारा; निवडणूक आयोगाला…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -