घरमनोरंजनKedar Shinde : शाहीर साबळेंच्या स्मृतिदिनानिमित्त नातू केदार शिंदेंची भावुक पोस्ट

Kedar Shinde : शाहीर साबळेंच्या स्मृतिदिनानिमित्त नातू केदार शिंदेंची भावुक पोस्ट

Subscribe

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत. प्रत्येक गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांचा 20 मार्च म्हणजे आज स्मृतिदिन. 20 मार्च 2015 रोजी मुंबईतल्या राहत्या घरी वृद्धापकाळाने शाहीर साबळे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना जाऊन 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने नातू, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

केदार शिंदे यांनी शाहीर साबळेंचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “बाबा…शाहीर साबळे…आज तुमचा स्मृतिदिन…तुम्ही अजूनही आहात. प्रत्येक माणसाच्या मनात आणि तुमच्या अलौकिक गाण्याने, प्रत्येकाच्या कानात. वर्षानुवर्षे तुम्ही स्मरणात रहाल, कित्येक पिढ्या तुमच्याबद्दल जाणून घेऊ शकतील म्हणून #महाराष्ट्रशाहीर सादर केला. तुम्ही जे कलात्मक संस्कार केलेत त्याची गुरूदक्षिणा…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

- Advertisement -

 केदार शिंदे यांच्या पोस्टवर कलाकार मंडळींसह त्यांच्या चाहत्यांनी शाहीर साबळेंना विनम्र अभिवादन केलं आहे. वैशाली सामंत, सुकन्या मोने, जयवंत वाडकर, सीमा घोगळे, मयुर पवार, अशा अनेक कलाकारांनी केदार शिंदेंच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा आहेत. केदार शिंदेंच्या आईचे ते वडील होते. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) पुढे नेत आहेत. केदार यांनी शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटात सुपरस्टार अंकुश चौधरीने शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.

- Advertisement -

शाहीर साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 रोजी झाला. ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या महाराष्ट्र गीतासह ‘या गो दांड्यावरून…’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या…’ अशी दर्जेदार लोकगीतं त्यांनी महाराष्ट्राला दिली. शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -