घरमहाराष्ट्रNashik: शेवटपर्यंत फक्त ओबीसींसाठीच लढेन; मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य

Nashik: शेवटपर्यंत फक्त ओबीसींसाठीच लढेन; मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य

Subscribe

नाशिक,येवला:- ओबीसी समाजातील अनेक जातीत पोटजाती आहेत. जर आपल्याला आपले न्याय हक्क मिळवायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं. तसेच ओबीसींमध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोटजातींनी एकत्र येऊन भोई म्हणून एक छताखाली यायला हवं, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Nashik Will fight till the end only for OBCs Statement of Minister Chhagan Bhujbal)

महात्मा फुले नाट्यगृह येवला येथे आज भोई समाज आरक्षण एल्गार बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

येवला आमदार नरेंद्र दराडे, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रकांत मेश्राम, रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे, ज्ञानेश्वर खैरमोडे, गणेश सपकाळ, संतोष सासे, संतोष सोपे, संदीप डहाके, दिपक वाघ, योगेश आडने, संभाजी लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला कुठलाही विरोध नव्हता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी आपली मागणी होती. आता मराठा समाजाला स्वतंत्र आणि टिकणार आरक्षण देण्यात आलं आहे. तसेच ओबीसीतील सर्व घटकांनी एकत्र आले तरच प्रश्न सुटतील. तसेच देशात जातनिहाय जनगणना करणे ही आपली मागणी आहे. त्यामुळे सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

भुजबळ म्हणाले की, भोई समाज हा राजकीयदृष्ट्या आजही दुर्लक्षित आहे. त्यामुळे भोई समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारणात यावं. समाजात पालखी उचलणाऱ्या या भोई बांधवांनी आता पालखीत बसायला शिकल पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवांना केले. तसेच भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन रोटी बेटीसह सर्व व्यवहार करत आपल्या समाजाची प्रगती करावी असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्या.चंद्रकांत मेश्राम, दौलतराव शितोळे, ज्ञानेश्वर खैरमोडे, गणेश सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

(हेही वाचा: Thane Crime: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ब्लॅक मॅजिक, मुलींच्या शोषणप्रकरणी मांत्रिकाची टोळी अटकेत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -