घरमनोरंजनThalapathy Vijay : थलपती विजयचा 'CAA'ला विरोध! तामिळनाडू सरकारला पत्र

Thalapathy Vijay : थलपती विजयचा ‘CAA’ला विरोध! तामिळनाडू सरकारला पत्र

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सोमवारी 11 मार्च रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA लागू करण्याची घोषणा केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी CAA हा भाजपच्या जाहीरनाम्याचा अविभाज्य भाग होता. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर संसदेने 11 डिसेंबर 2019 रोजी तो लागू केला. मात्र, आता दक्षिण भारतातून CAA ला कडाडून विरोध होत असल्याचे दिसत असून, या कायद्याविरोधात लोक आवाज उठवू लागले आहेत. प्रसिद्ध साऊथ अभिनेता- राजकारणी थलापती विजय याने देखील CAA ला कडाडून विरोध केला आहे. इतकेच नाही तर, तर त्याने तामिळनाडू सरकारला पत्र लिहून आवाहन देखील केलं आहे.

थलापती विजय याने नागरिकत्व सुधारणा कायदा न स्वीकारण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी तामिळनाडू सरकारला CAA मंजूर न करण्याचे आवाहनही केले आहे. सोमवारी संध्याकाळी सीएएशी संबंधित अधिसूचना जारी झाल्यानंतर, थलापती विजय याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करताना त्याने लिहिले की, “सीएएची अंमलबजावणी मान्य नाही. ज्या वातावरणात देशातील सर्व नागरिक सामाजिक एकत्र आनंदाने रहात आहेत, तेथे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) सारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही.”

- Advertisement -

“हा कायदा तामिळनाडूमध्ये लागू करू नये, अशी विनंती विजयने तामिळनाडू सरकारला केली. या कायद्याची तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी होणार नाही याची राजकारण्यांनी खात्री करावी.” असेही विजयने त्याच्या निवेदनात नमूद केले आहे. विजय व्यतिरिक्त, इतर विरोधी नेत्यांनीही नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे नियम अधिसूचित केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच भाजप निवडणुकांपूर्वी समाजात फूट पाडण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. थलापती विजयशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला आहे. स्टॅलिन यांनी सीएएला भाजपच्या ‘विभाजनकारी अजेंड्या’चा भाग म्हटले आहे. लोक लवकरच त्यांना धडा शिकवतील, असे स्टॅलिन म्हणाले.

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता थलापती विजयने यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला. गेल्या महिन्यात विजयने त्यांच्या ‘तमिझगा वेत्री कळघम’ या नव्या पक्षाची घोषणा केली होती. मात्र, विजय यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार, २०२६मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजय याचा पक्ष सक्रिय राजकारणात एन्ट्री करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -