घरमहाराष्ट्रJitendra Awhad: श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्ये पाडण्याचा अजितदादांचा डाव; आव्हाडांचा गंभीर आरोप

Jitendra Awhad: श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्ये पाडण्याचा अजितदादांचा डाव; आव्हाडांचा गंभीर आरोप

Subscribe

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Jitendra Awhad Ajit Pawar plan to overthrow Srikant Shinde in Kalyan Jitendra Awhad s serious allegation)

जितेंद्र आव्हाडांना पाडायचे म्हणून त्यांना निधी द्यायचा नाही. आमच्या फायली अडकवल्या जातात. यावरून कळते की, राजकारणाची पातळी किती खालावली आहे. अजित पवार हे श्रीकांत शिंदे यांना पाडायचे काम करत आहेत. कल्याणमध्ये येऊन बोलायचं ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे. तुमच्या पुण्यात शरद मोहोळची हत्या होते. हे करुन तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत का आणत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

कळव्यातील एका मैदानाला महसूल विभागाने टाळे ठोकले. त्यामुळे जिंतेद्र आव्हाड यांनी मैदान परिसरात आंदोलन केले. हे मैदान बंद करण्यामागे अजित पवारांचा हात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेली दहा-बारा वर्षे आम्ही कचरा वगैरे साफ करून येथे चांगले मैदान बनवले. मी कधीही इथे येत नाही, काम करून देतो आणि वापरायला देतो. इथे चांगले पीचेस आहेत. इथे चांगल्या खेळाडूंना मोफत प्रॅक्टीस सुरू असते. इथे कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत नाही. मात्र अजित पवार यांनी इथल्या अधिकाऱ्यांना देवगिरीवर बोलावेल आणि हे मैदान उघडं कसं असं त्यांच्या भाषेत विचारलं आणि ताबडतोब टाळं लावालया सांगितलं, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कळव्यात एकही मैदान नाही. मध्यंतरी श्रीकांत शिंदे यांनी इथे एक कार्यक्रम आयोजित केला. एक खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना कोणई विरोध केला नाही. मात्र आता अजित पवार यांनी असं का केलं? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीविषयी जरांगेंची स्पष्ट भूमिका, समाजासमोर ठेवले दोन पर्याय )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -