Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health 'या' योगासनांमुळे केस गळतीच्या समस्येला करा गुड बाय

‘या’ योगासनांमुळे केस गळतीच्या समस्येला करा गुड बाय

Subscribe

तुम्हाला लांब, घनदाट आणि सुंदर केस हे सर्वांच आवडतात. पण, तुमच्या केसांची वाढ होत नाही, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशी योगासने (Yogasana) सांगणार आहोत की, ही योगासने तुम्ही केल्याने तुमचे केस लांब घनदाट आणि सुंदर होतील. यामुळे तुमच्या केस गळतीच्या समस्या देखील कमी होतील.

 

पर्वतासन

- Advertisement -

पर्वतासन हा दोन संस्कृत शब्दापासून बनला आहे. पर्वत शब्दाचा अर्थ डोंगर आणि आसन यांचा अर्थ मुद्रा, असा आहे. पर्वतासनला माउंटेन पोजच्या नावे देखील ओळखले जाते.

 • हात-पायावर या
 • हिप्सला वर करा
 • गुडघे आणि कोपर सरळ करा
 • उलट ‘V’ आकारात या.
 • तुम्ही तळव्यावर दाब द्या.
 • आता टाच मजल्यापासून वर करा.
 • या स्थितीत 8 ते 10 श्वास घेऊन थांबा.
 • मग जुन्या मुद्रेकडे परत या.

अर्थ पिंच मयूरासन

- Advertisement -

याला डॉल्फिन पोज म्हणून ओळखले जाते. अर्थ पिंच मयूरासन हा 4 शब्दांनी मिळून बलेला असतो. याचा अर्थ अर्धा, पिंच म्हणजे पंख, मयूरचा अर्थ मोर आणि आसन म्हणजे मुद्रा आहे.

 • सर्व प्रथम चटईवर उभे रहा.
 • आता हात खाली घ्या.
 • गुडघे अगदी सरळ ठेवा.
 • त्यानंतर हात आणि कोपर जमिनीवर ठेवा.
 • तुमच्या शरीराला ‘V’ आकारात आणा.
 • काही सेकंद या पोझमध्ये रहा.
 • आता जुन्या स्थितीत परत येण्यासाठी तुमचे हात वरच्या दिशेने हलवा.

शशांकासन

शशांकासन हे दोन संस्कृत शब्दांनी बनलेला आहे. आणि शशांकचा अर्थ ससा आणि आसनचा अर्थ मुद्रा आहे.

 • व्रजासनात बसा.
 • दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर सरळ ठेवा.
 • आता श्वास आत घ्या आणि दोन्ही हातवर करून सरळ करा.
 • मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवा.
 • श्वास सोडताना हळूहळू खाली वाकणे.
 • दोन्ही हात खाली आणा.
 • नाक आणि कपाळ जमिनीवर ठेवा.
 • दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा.
 • मग जुन्या मुद्रेकडे परत या.

सेतुबंध आसन

या पोजला ब्रिज म्हणू ओळखले जाते. हे संस्कृत शब्द 3 शब्दापासून सेतु, बंध आणि आसन एकत्र करून बनला आहे. यात सेतुचा अर्थ पुल, बंधचा अर्थ बांधना आणि आसन म्हणजे पोश्चर आहे.

 • हे करण्यासाठी, तुम्ही पाठीवर झोपा.
 • पाय वाकवा. हे करत असताना पायाचे घोटे आणि गुडघे सरळ रेषेत असावेत.
 • श्वास आतल्या दिशेने घ्या आणि हळू हळू पाठवर करत उठण्याचा प्रयत्न करा.
 • पण, तुम्हाला मान, खांदे आणि डोके जमिनीवरून ठेवा, ते उचलण्याची गरज नाही.
 • काही वेळ या पोझमध्ये रहा.
 • आता श्वास सोडताना हळूहळू पहिल्या स्थितीकडे परत या.

हेही वाचा – सूर्यनमस्कार करण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहे का?

- Advertisment -

Manini