Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health सूर्यनमस्कार करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहे का?

सूर्यनमस्कार करण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Subscribe

सूर्यनमस्काराचा (Surya Namaskar) अर्थ…. सूर्याला नमस्कार करणे किंवा अर्पण करणे असा आहे. सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील सर्व समस्या दूर होऊ शकतात, परंतु ते योग्य पद्धतीने केले पाहिजे. सूर्यनमस्काराने दिवसाची सुरुवात केल्याने तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात.

तज्ञांच्या मते, दररोज 5-10 मिनिटे सूर्यनमस्कार केल्यावर तुम्हाला कोणतेही आसन करण्याची गरज भासणार नाही. सूर्यनमस्कार करताना सूर्यकिरणांचा थेट परिणाम शरीरावर होत असल्याने तुमचे अनेक आजारही दूर होतात. म्हणूनच आपण सर्वांनी दररोज सूर्यनमस्कार केले पाहिजेत, पण का ते आज आपण पाहू या.

- Advertisement -

चमकदार त्वचा

दररोज सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या रक्ताभिसरणाला चालना मिळते, ज्यामुळे तुमची त्वचा आणि चेहऱ्याची चमक परत येते. हे सुरकुत्या आणि लवकर वृद्धत्व टाळण्यास मदत करते, असेही म्हटले जाते. वयाचा प्रभाव चेहऱ्यावर कमी दिसावा, असे वाटत असेल तर सूर्यनमस्कार नियमित करावेत.

- Advertisement -

डायजेस्टिव सिस्टम चांगले होते

या आसनामुळे डायजेस्टिव सिस्टम सुरळीत चालण्यास मदत होते. तसेच, ते पचनसंस्थेत रक्तप्रवाह वाढवण्याचे काम करते. यामुळे आतड्यांचे कार्य देखील सुधारते. फॉरवर्ड पोज विशेषत: ताणून पोटाची जागा आतून वाढवण्यास मदत करते. जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर हा योग नियमित करा.

मानसिक आरोग्यासाठी चांगले

जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य सुधारायचे असेल तर योगा नियमित करा. तुम्हाला तुमच्या शारीरिक स्वरुपातच नाही तर तुमच्या मानसिक स्वरुपातही फरक दिसेल. हे स्मृती आणि नर्वस सिस्टमला सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे तुम्हाला शांत होण्यास आणि चिंतापासून मुक्त होण्यास मदत करते. हे अंतःस्रावी ग्रंथींच्या क्रियाकलापांना सामान्य करते आणि थायरॉईड समस्या असलेल्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर आहे.

मासिक पाळीत मदत करते

सूर्यनमस्कारामुळे मासिक पाळीचे चांगले नियमन होण्यासही मदत होते. ओटीपोटाचे स्नायू मजबूत करते आणि मासिक पाळीतील वेदना देखील कमी करते. यासाठी तुम्हाला फक्त सकाळी थोडे लवकर उठून आरामात करावे लागेल. यामुळे दुखण्यात आराम तर मिळेलच पण रक्तप्रवाहही कमी होईल.


हेही वाचा – Workout करताय मग आधी ‘हे’ वाचा

- Advertisment -

Manini