घरमहाराष्ट्रSharad Pawar on PM Modi: मोदींकरिता मी 'संताजी-धनाजी'; शरद पवारांचा घणाघात

Sharad Pawar on PM Modi: मोदींकरिता मी ‘संताजी-धनाजी’; शरद पवारांचा घणाघात

Subscribe

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे

सांगोला: इतिहासात आपण वाचला आहे की, काही लोकांना छत्रपती शिवरायांच्यानंतर संताजी आणि धनाजी लोकांना पाण्यात दिसत असत. आज तशाच प्रकारची चिंता आमच्याबद्दल वाटते त्यामुळेच अशी विधान आमच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला आहे. ते पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला येथे सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र डागलं आहे. (Sharad Pawar on PM Modi I am Santaji Dhanaji for Modi Sharad Pawar s attack)

शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार उदासीन

शरद पवार म्हणाले की, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बद्दलची आस्था या सरकारला राहिलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ज्या ज्या वेळेला मी चर्चेला जातो, त्यावेळी कृषीमंत्र्यांकडून मला एकच उत्तर मिळतं. तुमच्या आणि आमच्या दृष्टिकोनात फरक आहे. मी विचारलं काय? त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही जो पिकवतो त्याचाच विचार करता. पण आम्ही जो खातो त्याचाही विचार करतो. खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यात काही वाद नाही. पण पिकवलं नाही आणि शिकवणारा जगला नाही, तर खाणारा खाणार काय? आणि मग खाणाऱ्यांची गरज भागवायची असेल, तर पहिलं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार यांनी यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुस्तकातील संदर्भावरही टीकास्त्र डागलं. पवार म्हणाले की, कालच मी एक पुस्तक वाचत होतो. ते पुस्तक महाराष्ट्रातले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेलं होतं आणि ते चंद्रकांत पाटील भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते. त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे की, मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या शंभर साखर कारखान्यांवरील Excise Duty माफ करण्याचा निर्णय हा मोदींनी घेतला. शरद पवार दहा वर्षे त्या खात्याचे मंत्री होते. त्यांना हा निर्णय घेता आला नाही. तो आम्ही घेतला. खरी गोष्ट आहे. पण माझ्यापुढे प्रश्न होता की, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं की साखर कारखान्यांवरील. त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

आज शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. आम्ही ज्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी केल्या त्या हे सरकार मुळीच करत नाही. आज पंतप्रधान मोदी सोलापुरात आहेत. त्यांचं भाषण ऐका. 100 टक्के ते माझ्यावर टीका करणार. परवा शिर्डीला गेले तेव्हा मंदिरात दर्शन घेतलं आणि भाषणात म्हणाले शरद पवारांनी देशासाठी काय केलं? शिर्डीच्या दर्शनाला आले होते ना मग दर्शन घ्यायचं नाही, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -