घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : 'शिवसेना संपवून दाखवाच'; उद्धव ठाकरे यांचं खुलं आव्हान

Uddhav Thackeray : ‘शिवसेना संपवून दाखवाच’; उद्धव ठाकरे यांचं खुलं आव्हान

Subscribe

राज्यातील राजकीय उलथापालथींना वेग आल्याचे चित्र असून, राज्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात सभा पार पडली तर दुसरीकडे सांगोल्यात शरद पवारांनी पंतप्रधानांवर टीका केली. या सगळ्या रणधुमाळीत महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आज उत्तर भारतीयांनी प्रवेश केला.

मुंबई : राज्यातील राजकीय उलथापालथींना वेग आल्याचे चित्र असून, राज्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात सभा पार पडली तर दुसरीकडे सांगोल्यात शरद पवारांनी पंतप्रधानांवर टीका केली. या सगळ्या रणधुमाळीत महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आज उत्तर भारतीयांनी प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवून दाखवाच असं खुलं आव्हान भाजपसह शिंदे गटाला दिलं. (Uddhav Thackeray ‘Finish Shiv Sena Uddhav Thackerays open challenge)

मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मुंबई उपनगरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. ठाकरे गटात पक्ष प्रवेशावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मन की बात विचार करून केली जाते. मात्र, दिल की बात दिलसे म्हणजेच मनापासून केली जाते. आज तुम्ही मला दिल की बात सांगितली. आम्ही काय केलं, आम्ही कुणाला मदत केली. ही गोष्टी आठवणीत ठेवत नसतात त्याची आठवण ठेवली पाहीजे. तुम्ही सांगितले की, 1992-1993 मध्ये मुंबईला कुणी वाचवलं होतं. शिवसैनिक आणि शिवसेनेच वाचवलं होतं. जेव्हा- केव्हा मुंबईवर संकट येतं तेव्हा फक्त शिवसेना आणि सैनिकच पुढे असतात. हीच बाळासाहेबांची शिकवण आहे. जेव्हा आम्ही रक्तदान करतो तेव्हा तेव्हा आम्ही हा विचार नाही करत की, हे कुणाला जाणार आहे. जाती, धर्म तर सोडाच आम्ही हासुद्धा विचार नाही करत की तो कोणत्या राज्यातील आहे. कारण, सर्व हिंदू एकच आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : PM Modi In Solapur : सोलापुरातील कार्यक्रमात मोदींना अश्रू अनावर, भावूक होत म्हणाले…

मला बाळासाहेब ठाकरे यांनी भरसभेत भाजपचे द्विगंत नेते प्रमोद महाजन यांना म्हटल्याचं आठवत की, बघा तो काळ वेगळा होता जेव्हा लोक हिंदू म्हणवून घ्यायलाही घाबरत होते. परंतु तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं होतं की, गर्व से कहो हम हिंदू है. हा नारा त्यांनी त्यावेळी दिला होता आणि तो बुलंद केला. तेव्हा बाळासाहेबांनी प्रमोद महाजन यांना म्हटलं होतं की, या देशात हिंदू व्यक्ती हा हिंदू म्हणून मतदान करेल. आता तो काळ आला आहे. मात्र, तो काळ वेगळा होता. संघर्ष कुणी दुसऱ्यांनीच केला आणि त्याचा लाभ घेणारे आज सत्तेवर बसले आहेत. मला नाही वाटत की संघर्ष आणि त्यांचा काहीएक संबंध आहे. आयती बनवललेली भाकर ते आज खात आहेत. ज्यांनी संघर्ष केला ते आज नाहीत, आणि जे आहेत त्यांना बाजुला सारलेलं आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या मातोश्रीवर अनेक लोक येऊन गेलेत.

- Advertisement -

हेही वाचा : Yavatmal : दोन काश्मिरी तरुणांना अटक; दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय

मलाही भेटण्यासाठीही अनेक लोक येऊन गेलेत. त्यावेळी बाळासाहेबांनी अनेकांना वाचवलं होतं. त्यावेळी त्यांनी विचार नाही केला की, हा पुढे जाऊन काय करेल. मात्र, ज्यांना बाळासाहेबांनी वाचवलं होतं आता तेच लोक आहेत की, शिवसेना संपवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु माझं त्यांना खुलं आव्हान आहे की, त्यांनी शिवसेना संपवून दाखवावी. अनेक लोक आहेत ज्यांना आमची सत्तेसाठीची लढाई संपवायची आहे, पण जे सत्तेत आहेत आणि ज्यांच्याशी आम्ही लढतोय त्यांना सोडणे कठीण आहे. असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -