घर महाराष्ट्र 'ईडी ही दहशतवादी संघटना'; संजय राऊतांचा घणाघात

‘ईडी ही दहशतवादी संघटना’; संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

ईडी ही दहशतवादी संघटना असल्याचंही ते यावेळी म्हणालेत. या देशात ईडीने जी दहशत निर्माण केली आहे. ज्या गोष्टीचा पोलीस तपास करू शकतात. ज्या गोष्टीचा तपास राज्याचा आर्थिक विभाग करू शकतो, तिथे ईडी घुसवून केंद्रानं नियंत्रण ठेवायचं आणि विरोधकांवर दडपण आणून आपल्याकडे खेचायचं सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच, ईडी ही दहशतवादी संघटना असल्याचंही ते यावेळी म्हणालेत. या देशात ईडीने जी दहशत निर्माण केली आहे. ज्या गोष्टीचा पोलीस तपास करू शकतात. ज्या गोष्टीचा तपास राज्याचा आर्थिक विभाग करू शकतो, तिथे ईडी घुसवून केंद्रानं नियंत्रण ठेवायचं आणि विरोधकांवर दडपण आणून आपल्याकडे खेचायचं सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला, ते मीडियाशी संवाद साधत होते. (Thackeray group leader Sanjay Raut Criticized Modi Government on ED )

ईडीने दहशतवाद माजवला आहे. हे मी सांगत नाही आहे, तर हे ज्येष्ठ कायदे पंडित हरिश साळवे यांनी कोर्टात सांगितलं आहे. ईडीला आवरलं नाही तर देशात अराजक निर्माण होईल, असं त्यांनी सांगितलं. तेच मी रिपीट केलं आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

मणिपूर हिंसाचारावरूनही त्यांनी भाजपला फटकारलं. जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री असताना त्यांनी सुद्धा मणिपूरचा प्रश्न हा भविष्यात काश्मीरपेक्षा चिंताजनक होईल,असं म्हटलं होतं. काश्मीरपेक्षा मणिपूरचा धोका सर्वाधिक आहे हे ओळखायला पाहिजे. कारण त्याच्या बाजूला चीनच्या सीमा आहेत किंवा अन्य देशाच्या सीमा आहेत. हा धोका एनडीएच सरकार असताना जॉर्ज फर्नांडिस यांनी दिला होता. त्याचा अभ्यास केला पाहिजे.

बाकी गृहमंत्री काय बोलतात ते राजकीय भाषण आहे. त्यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान उत्तर देतील. ते आज बोलणार आहेत. विरोधकांनी मणिपूर संदर्भातील ठराव, नोटीस दिली होती. तेव्हाच मोदी बोलले असते तर आज अविश्वास ठराव आणण्याची वेळ आली नसती, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: राहुल गांधींनी फ्लाईंग किस का केलं? राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर )

…म्हणून राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष कोणत्या कारणावरून राजकारण करेल त्याचं काही सांगता येत नाही. जेव्हा महिला पैलवानांचं आंदोलन जंतर- मंतरवर सुरू होतं तेव्हा कोणी गेलं होत का? असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला केला. द्वेष, बदला यावर उतारा म्हणून राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जादू की झप्पी म्हणतो ना आपण तसा हा जादू का फ्लाइंग किस त्यांनी दिल्याचं राऊत यावेळी म्हणाले. तो फ्लाइंग किस हा देशासाठी आहे. जे मोहब्बत की दुकान त्यांनी उघडलेलं आहे, त्या मोहब्बतच्या दुकानातलं किस हे महत्त्वाचं शस्त्र आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी अशाप्रकारचे अनेक फ्लाइंग किस दिले. परंतु, ज्यांना प्रेमाची सवय उरलेली नाही, ममत्व उतरलेलं नाही त्यांना हा प्रेमाचा फ्लाइंग किस म्हणजे काय हे समजणार नाही, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला.

- Advertisment -