नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागेल. अशा परिस्थितीत उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. यासाठीच निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचे दर निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी चहा, पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली, तर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसार पैसे द्यावे लागतील. झेंड्यापासून खर्चीपर्यंत सर्वांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
हेही वाचा – Politics: शिवसेनेसमोर काँग्रेसचे लोटांगण; आठवड्याभरात निर्णय घेणार,निरुपम यांचा अल्टिमेटम
नियमांचे पालन करत निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यादृष्टीने निवडणूक आयोग अत्यंत बारकाईने सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. विविध पक्षांकडून आता उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यानंतर उमेदवारांचा प्रचार सुरू होईल. यासाठी रॅली, सभामंडप, लाऊडस्पीकर यासह ढोल-ताशांचा वापर केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रत्येक वस्तूची किंमत निश्चित केली आहे. उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांना चहा दिल्यास प्रति चहा 20 रुपये आणि कॉफीसाठी 25 रुपये निवडणूक खर्चात जोडले जातील. तुम्ही नाश्त्यासाठी 30 रुपये आणि वडापावसाठी प्रति व्यक्ती 25 रुपये खर्च करू शकता.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचाररथांचा वापर करतात. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने रथाचे भाडे दोन तासांसाठी 15,550 रुपये आणि तीन तासांसाठी 22 हजार रुपये असे निश्चित केले आहे. उमेदवाराने ढोल-ताशे वापरल्यास निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसार तो खर्च ग्राह्य धरला जाईल. महानगरात दोन तासांसाठी 10 ढोल आणि एक ताशा (लहान युनिट) या जोडीचे भाडे 18,500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. दोन तासांसाठी 25 ढोल-ताशासाठी 32 हजार रुपये आणि 50 ढोल-ताशासाठी 55 हजार रुपये ग्राह्य धरला जाईल.
हेही वाचा – Mahayuti : रिपाइंला झालेली जखम कशी भरून काढणार? रामदास आठवलेंचा फडणवीसांना सवाल
निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या किमतीनुसार आपला खर्च डायरीत लिहावा लागेल. यावेळी निवडणूक प्रचार आणि रॅलींमध्ये वापरल्या जाणाऱ्या झेंड्याची किंमत आकाराच्या आधारे ठरवण्यात आली आहे. लहान कापडी ध्वजाची किंमत 7 रुपये, रेशमी ध्वज 40 रुपये, जम्बो ध्वज 70 रुपये आणि मोठ्या जम्बो ध्वजाची किंमत 260 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सामान्य टोपी 10 रुपये, कॉटन मफलर 10 रुपये आणि सिल्क मफलर 15 रुपये असेल. पेपर मास्कचा दर तीन रुपये निश्चित करण्यात आला आहे.
हेही वाचा – Loksabha 2024: ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीसह 17 जागांची यादी जाहीर; काँग्रेसची कोंडी