घरताज्या घडामोडीWoman Delivers Baby : टीसी, प्रवाशांच्या मदतीने धावत्या एक्स्प्रेसमध्ये महिलेने दिला बाळाला...

Woman Delivers Baby : टीसी, प्रवाशांच्या मदतीने धावत्या एक्स्प्रेसमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म

Subscribe

बऱ्याचदा रुग्णवाहिका, रुग्णालयाअभावी अनेक महिलांनी मोकळ्या जागेचा आसरा घेऊन बाळाला जन्म दिल्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक घटना ट्रेन क्रमांक 12293 एलटीटी-प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमध्ये घडली आहे.

प्रयागराज : बऱ्याचदा रुग्णवाहिका, रुग्णालयाअभावी अनेक महिलांनी मोकळ्या जागेचा आसरा घेऊन बाळाला जन्म दिल्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक घटना ट्रेन क्रमांक 12293 एलटीटी-प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. एक्स्प्रेसमधील तिकीट तपासनिसांच्या मदतीने या महिलेने बाळासा सुखरूप जन्म दिला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, मध्य रेल्वेने ट्विटवरून याबाबत माहिती दिली. (woman delivers baby in ltt prayagraj duronto express by tc co passenger)

मिळालेल्या माहितीनुसार, एलटीटी-प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमधील कोच क्रमांक 12 मधून एक गरोदर महिला प्रवास करत होती. आपल्या कुटुंबियांसोबत ही महिला प्रयागराज येथे आपल्या मूळ गावी जात होती. त्यावेळी प्रवासादरम्यानच या महिलेला अचानक तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर सहप्रवाशांनी तिकीट तपासनिसांना (टीसी) याबाबत माहिती दिली. त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत टीसींनी बुऱ्हाणपूर येथे आपत्कालीन थांबा देण्याची व्यवस्था केली. मात्र, या महिलेच्या वेदना आणखी वाढल्याने इतर महिला प्रवाशांची मदत घेऊन तिची गाडीतच सुखरूप प्रसूती करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – AC Local Train Fare : उकाडा वाढताच AC लोकलची भरभराट; एकाच दिवसात इतक्या पासांची विक्री

या महिलेने बाळाला जन्म दिला असून बुऱ्हाणपूर येथे गाडी थांबवून महिला आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळ आणि आईची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक्स्प्रेसमधील चार तिकीट तपासनिसांचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. तसेच, महिला आणि तिच्या कुटुंबीयांनीही मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनिसांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Local : लोकलमध्ये 15 वर्षीय मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -