Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenCleaning Tips : बाथरूम clean करण्याच्या झटपट टीप्स

Cleaning Tips : बाथरूम clean करण्याच्या झटपट टीप्स

Subscribe

आपल्यापैकी बरेच जण बाथरूम स्वच्छ करण्यात तासनतास घालवतात आणि तरीही बाथरूम साफ होत नाही असे वाटते. तसेच अनेक वेळा आपल्याला बाथरूमच्या अनेक वस्तू आपल्या जागेवर ठेवल्या जात नाहीत. अशातच त्या वस्तुंना ओलावा लागून त्या खराब होतात. बाथरूमच्या  साठी योग्य स्वच्छ करावी लागते. त्यासाठी घरात झटपट स्वच्छता कशी करता येईल याकडे जास्त लक्ष असते. पण आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. बाथरूम हॅक्ससाठी या टिप्स खूप उपयुक्त ठरतील.

20 Amazing Tricks for Cleaning Your Bathroom — Best Life

- Advertisement -

मायक्रोफायबर कापडाने स्लॅब स्वच्छ करा-
चेहरा धुताना अनेकदा सिंकच्या स्लॅबमध्ये पाणी भरते आणि ते ओले होते. त्यात पाणी साचल्याने स्लॅबवर पांढरे डाग पडतात. आंघोळ केल्यावर मायक्रोफायबर कापडाच्या साहाय्याने लगेच नळ आणि स्लॅब स्वच्छ करा. स्लॅब साफ करण्यासाठी बाथरूममध्ये एक कापड लावा.

ड्रेन स्वच्छ करा-
शॉवरनंतर केस अनेकदा बाथरूमच्या ड्रेनमध्ये अडकतात. काही वेळा साबण किंवा शॅम्पूचा घाण साचल्यामुळे पाणी जाम होऊ लागते. अशावेळी तुम्ही जेव्हाही आंघोळ कराल तेव्हा लगेच केस काढून टाका. पाणी आणि वायपरच्या साहाय्याने साबणाची घाण स्वच्छ करा. यामुळे, जमिनीवर डिटर्जंट, साबण आणि शैम्पूचे कोणतेही डाग राहणार नाहीत.

- Advertisement -

आरसा वाइप करा-
बाथरूममध्ये काच लावल्यास गरम पाण्याची वाफ त्यावर बसते. तसेच पाण्याच्या शिंतोड्यांमुळे काच अधिक घाण दिसते. अशातच आंघोळ केल्यानंतर नेहमी लहान वायपरच्या मदतीने तुमच्या बाथरूममधील शॉवर ग्लास स्वच्छ करा. एकदा पुसल्यानंतर, कोरड्या वर्तमानपत्राच्या मदतीने काच पटकन पुसून टाका.

फरशा स्वच्छ करा-
टाइल्सच्या मध्ये काळेपणा अनेकदा दिसून येतो. ते स्वच्छ करण्यासाठी, बेकिंग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साइड, डिटर्जंटचे पाणी तयार करा आणि टाइल्सवर मारा. यांनतर 20 मिनिटे हे राहू द्या. आणि नंतर स्क्रबने स्क्रब करा. यानंतर पाण्याने धुतलेल्या मायक्रोफायबर कापडाने टाइल्स स्वच्छ करा.

बाथटब स्वच्छ करा-
बाथरूममध्ये बाथटब असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी बाथरूमच्या कॅबिनेटमध्ये नेहमी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर ठेवा. मुलांनी आंघोळ केल्यावर ड्रेनमध्ये बेकिंग सोडा टाकून त्यात व्हिनेगर टाकून थोडा वेळ तसाच राहू द्या. मग सॉफ्ट स्पंजच्या मदतीने टब स्वच्छ करा आणि कोमट पाण्याने धुवा.


हेही वाचा:  किचनमध्ये रद्दी पेपरचा करा असा उपयोग

- Advertisment -

Manini