Friday, April 26, 2024
घरमानिनीघर साफ करण्याचा कंटाळा येतो? फॉलो करा 'या' टीप्स

घर साफ करण्याचा कंटाळा येतो? फॉलो करा ‘या’ टीप्स

Subscribe

रोज ऑफिसची, घरातील इतर काम करता करता थकवा जाणवल्यास आपण ना घर स्वच्छ ठेवू शकत ना स्वत:ची काळजी घेत. त्यामुळे घरची साफसफाई करायला कंटाळा येतो काहीजण मदत करण्यासाठी घरात मोलकरीण ठेवतात. पण काहींना मोलकरीण ठेवने सर्वांना शक्य नसते. स्वतःला काम करायला आवडत नाही तेव्हा आणखीन अडचणी वाढतात. अशावेळी घर रोजच्या रोज स्वच्छ ठेवण्यासाठी का करता येईल असा प्रश्न पडतो. काही सोप्या टीप्स फॉलो करुन तुम्ही कमीत कमी मेहनतीत घर स्वच्छ ठेवू शकता.

सकाळी उठल्याबरोबर अंथरुण आवरुन घ्या 

सकाळी तुम्ही उठल्याबरोबर लगेच बेड आवरून घ्या त्यामुळे नंतरच्या त्रासापासून स्वतःला वाचवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही बेड व्यवस्थित केला तर बेडरूम आपोआप स्वच्छ दिसते.

- Advertisement -

कमी सामान ठेवा 

घरात तुम्हाला गरज नसलेल्या वस्तू बाहेर काढा. कारण घरात जास्त सामान असल्याने साफसफाईचा ताण वाढतो. जर तुम्हाला हा तान दूर करायचा असेल तर कमी जागा लागेल आणि दोन पेक्षा जास्त कामासाठी वापरता येईल अशा वस्तू खरेदी करा. असे केल्याने तुम्हाला साफसफाईचे जास्त टेन्शन राहणार नाही आणि पैसेही वाचण्यास मदत होईल.

फ्रिज् लायनर वापरा

फ्रिज् स्वच्छ करणे हे काही लोकांसाठी खूप त्रासदायक आहे आणि तुम्हालाही फ्रिज् साफ करण्याचा कंटाळा येत असेल तर अशावेळी फ्रिज् लाइनर मेट वापरा. ते स्वच्छ करणे खूप सोपे आहे तसेच वॉटरप्रूफ आणि ऑइल प्रूफ असल्यामुळे हे फायदेशीर आहे.

- Advertisement -

डोरमॅटचा वापर करा 

डोरमॅटचा वापर बाहेरील धुळीपासून बचाव करण्यासाठी होतो. डोअरमॅट महिन्यातून एकदा धुवावे लागते. घरात नेहमी तीन डोअर मॅट ठेवले पाहिजे. त्यामुळे तुमचे घर दीर्घकाळ स्वच्छ राहण्यास मदत मिळेल आणि लवकर घाण होणार नाही.

ह्युमिडिफायरने घर स्वच्छ ठेवा

ह्युमिडिफायर तुम्हाला घर स्वच्छ ठेवण्यातही मदत करू शकते. जर घरात खूप धूळ जमा होत असेल तर तुम्ही घरात ह्युमिडिफायर लावू शकता. यामुळे घरातील आर्द्रता नियंत्रणात राहते आणि तुम्ही घरातील धूळ सहजतेने उडवू शकता.

डस्ट मॉब चप्पल घाला 

जर तुम्हाला रोज झाडू न लावता घर स्वच्छ ठेवायचे असेल तर डस्ट मॉब चप्पल हा एक उत्तम उपाय आहे. याच्या मदतीने तुम्ही घरातील धूळ सहज बाहेर काढू शकता त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही आणि घरीही स्वच्छ होईल.

 


हेही वाचा : Kitchen Tips : महिलांसाठी खास टिप्स

- Advertisment -

Manini