घरमहाराष्ट्रपुणेSupriya Sule : अजित पवारांना जे योग्य वाटले ते केले, सुप्रिया सुळेंनी...

Supriya Sule : अजित पवारांना जे योग्य वाटले ते केले, सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

Subscribe

अजित पवार हे आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असे विधान काल सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आले होते. ज्यानंतर त्यांनी या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, असे वक्तव्य काल गुरुवारी (ता. 24 ऑगस्ट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. पण काल लेकीने केलेल्या वक्तव्याला आज (ता. 25 ऑगस्ट) शरद पवार यांच्याकडून सुद्धा दुजोरा देण्यात आला होता. अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचे कारण नाही, असे वक्तव्य आज सकाळी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केले.

हेही वाचा – शरद पवारांच्या वक्तव्यामुळे आमच्याही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; अंबादास दानवे थेटच बोलले

- Advertisement -

त्यानंतर पाच तासांमध्ये शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या त्यांच्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. मी असे काही बोललो नसल्याचे त्यांनी पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर म्हटले आहे. त्यामुळे काही तासांमध्ये शरद पवारांनी स्वतःच्याच वक्तव्यावरून यु-टर्न घेतल्याने आणखी एक संभ्रम निर्माण झाला आहे. तर आता एबीबपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. (Ajit Pawar did what he thought was right, Supriya Sule explained the role)

यावेळी एबीपी माझाशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे स्थापनेपासून अध्यक्ष आहेत. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीने गेली 24 वर्षे संविधानाच्या चौकटीत राहून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच आम्ही केंद्रातही आणि महाराष्ट्रातही विरोधी पक्षातच आहोत, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर राष्ट्रवादीतील 9 आमदार आणि 2 खासदार यांनी वेगळा एक निर्णय घेतला. जो आमच्या विचारधारेला पटण्यासारखा नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे पक्षाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच त्यांची भूमिका ही पक्षाला मान्य नसल्याने लोकसभा अध्यक्षांना आणि विधानसभा अध्यक्षांना आम्ही याबाबतचे पत्र लिहून त्या आमदार आणि खासदारांची भूमिका मान्य नसल्याचे पत्रातून सांगितले आहे. त्यांची भूमिका ही आमच्या विचारधारेच्या चौकटीत बसणारी नसल्याने आम्ही पहिल्या दिवसापासून पारदर्शकपणे ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. या भूमिकेत आत्तापर्यंत कोणताही बदल झालेला नाही. संभ्रम असेल तर तो नसावा कारण माझी विरोधातील भूमिका स्पष्ट आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

तसेच, अजित पवारांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रालाच मान्य आहे. सगळ्या पक्षांमध्ये अनेक चांगले नेते असतात. प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात. आम्ही अटलबिहारी वाजपेयींचे नेतृत्व मान्य केले, एनडी पाटलांचेही मान्य केले. त्यामुळे असंख्य नेते विविध पक्षांमध्ये असतात. त्यांच्यातील नेतृत्व त्यांच्यातील चांगले गुण हे समाजाला मान्यचं असतात, असे सुप्रिया सुळे यांत्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -