Monday, April 15, 2024
घरमानिनीRelationshipजोडीदाराशी भांडण झालय, असे मिटवा

जोडीदाराशी भांडण झालय, असे मिटवा

Subscribe

रिलेशनशिप ही आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. पण त्यासाठी जीवाला जीव लावणाऱ्या दोन व्यक्ती एकत्र येणे गरजेचे असते. तर ते रिलेशनशिप जास्त खुलते आणि सुंदर होते. मात्र प्रेम, नाते वा रिलेशनशिप ही गोष्ट जेवढी सुंदर आणि तितकीच ती नाजूक सुद्धा आहे. विशेष करून जेव्हा तुमच्या नात्यात भांडण होते तेव्हा त्या नात्याला अगदी नाजूकपणे हाताळावे लागते. अनेकवेळा ‘इगो’ हे नाते तुटण्याचे किंवा बिघडण्याचे कारण बनते. कारण अनेकदा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जोडीदाराने भांडण संपविण्यासाठी पुढाकार घ्यावा. मात्र, अशा वेळी जर दोघांनीही इगोमुळे बोलणं बंद ठेवले तर गैरसमज अधिक वाढू शकतात.

1) सकारात्मक पद्धतीने बोलणे सुरु करा
भांडण संपल्यानंतर तुम्ही त्याच मुद्द्याबद्दल पुन्हा बोलण्यास सुरुवात केल्यास, तो लढा संपण्याऐवजी वाढू शकतो. त्यामुळे भांडण मिटल्यानंतर एकमेकांचे दोष दाखविण्याऐवजी सकारात्मक मुद्द्यापासून सुरुवात करा.

Why Do Relationships Fail?

2) नात्यात इगो आणू नका
काहीवेळा तुमचा इगो हे नाते बिघडण्याचे मुख्य कारण असू शकते. कारण अनेकदा तुम्हाला वाटतं की तुमच्या जोडीदाराने भांडण संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा परिस्थितीत, जर दोघांनीही त्यांच्या इगोमुळे बोलणे बंद ठेवले तर गैरसमज आणखी वाढू शकतात. म्हणून, जर भांडण झाले असेल तर शांतपणे विचार करा आणि पुढे जा तसेच समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

3) प्रेम दाखवून द्या
तुमच्या प्रेमाचा गोडवा तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील भांडणाची कटुता कमी करण्यासाठी पुरेसा आहे. अशा वेळी एखाद्या मुद्द्यावरून भांडण होत असेल, तर स्वत:ला थोडा वेळ द्या आणि मग भांडण संपवण्यासाठी प्रयत्न करा. तसेच तुमच्या जोडीदाराला दाखवा की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता आणि त्याचे तुमच्या जीवनात काय महत्त्व आहे. यासाठी जोडीदाराला तुम्ही फुले देऊ शकता किंवा त्याची आवडती डिश तयार करू शकता डिनर डेट जाऊन शकता. तुमच्या दोघांसाठी पुन्हा कनेक्ट होण्याचा हा एक उत्तम मार्ग असू शकतो.

 

- Advertisement -

हेही वाचा ; लग्नानंतर तुमचं नातं ‘बोरिंग’ झालंय?

 

- Advertisement -

 

- Advertisment -

Manini