Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship Ex पार्टनर पुन्हा आयुष्यात येऊ पाहत असेल तर असे करा हँन्डल

Ex पार्टनर पुन्हा आयुष्यात येऊ पाहत असेल तर असे करा हँन्डल

Subscribe

प्रेमाचे नाते हे विश्वासाच्या धाग्यावर टिकलेले असते असे वेळोवेळी म्हटले जाते. परंतु एखादा पार्टनर तुम्हाला फसवून दुसऱ्यासोबत रिलेशनशिप जोडत असेल तर अशा नात्यात न राहिलेलेच बरे. काहीवेळ असे होते की, पार्टनर आपली ही चूक लपवण्यासाठी खुप खोटं ही बोलेल पण तुम्ही तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. अशातच नाते मोडून खुप काळ झाला आणि आता पुन्हा त्याच एक्स पार्टनरला तुमच्याशी नात्यात यायचे असेल तर अशावेळी काय करावे हे बहुतांशजणांना कळत नाही. (Ex-partner wants to come in your life)

अशावेळी नक्की काय करावे याच बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक्स पार्टनरल तुम्हाला सतत फोन किंवा मसेज करत असेल तर त्याला लगेच तुमचे उत्तर देऊ नका.

- Advertisement -

उत्तर देण्यासाठी वेळ घ्या
खुप वर्षानंतर तुमचा एक्स पार्टनर तुम्हाला कॉन्टॅक करुन तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ पाहत असाल तर नक्की याचा अर्थ काय काढावा हे कळत नाही. अशातच गरजेचे आहे की, स्वत: या बद्दल विचार करा. भले पार्टनर तुमच्या उत्तराची खुप वेळ वाट पाहत असेल तरीही उत्तरासाठी वेळ घ्या. लगेच उत्तर देऊ नका. यामुळे प्रपोजल मागील काही कारण ही तुम्हाला कळतील.

- Advertisement -

ब्रेकअपच्या कारणावर विचार करा
तु्म्ही जेव्हा एक्स सोबत ब्रेकअप केले तेव्हा काय मनाशी निर्णय केला होता ते आठवा. नक्की कोणत्या कारणामुळे तुमचे ब्रेकअप झाले होते याचा सुद्धा विचार करुन निर्णय घ्या. एक्सला पुन्हा आयुष्यात परत आणण्यापूर्वी या मुद्द्यावर ही विचार करा.

आपल्या करंट पार्टनरच्या भावनांचा विचार करा
एक्स पार्टनरला तुमच्या आयुष्यात थारा देण्याआधी तुमच्या आताच्या पार्टनरच्या भावनांचा सुद्धा विचार करा. त्याला तुमच्या त्या निर्णयामुळे काय वाटेल याचा ही विचार करा.

नात्यातील टोकाचे वाद आठवा
कोणतेही नाते एका दिवसाच्या वादामुळे तुटत नाही. त्यामुळे नाते पुढे घेऊन जायचे असेल किंवा एक्सला पुन्हा तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायचे असेल तुम्ही जुने टोकाचे वाद आठवा. यामुळे काही गोष्टी खुप क्लियर होतील. त्या व्यक्तीसोबत भविष्यात खरंच आनंदी राहू शकता का हे सुद्धा कळेल.(Ex-partner wants to come in your life)

हा बोलण्यामागील मोठं कारण शोधा
एकदा नाते मोडल्यानंतर एक्स पुन्हा आयुष्यात येऊ पाहत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही होकार देणार असाल त्यावेळी आधी विचार करा. खरंच त्याच्याशी नाते का जोडावे आणि जर जोडले तर पुन्हा तुम्ही चुकी करत नाहीत ना हे सुद्धा पहा. केवळ इमोनशल होऊन विचार करु नका.


हेही वाचा- तुमचा ऑनलाईन डेटींग पार्टनर तुम्हाला फसवतोय का? हे आहेत संकेत

- Advertisment -

Manini