घरमहाराष्ट्रPratibha Dhanorkar : पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेला; आमच्या पक्षात भाजपाच्या...

Pratibha Dhanorkar : पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेला; आमच्या पक्षात भाजपाच्या…

Subscribe

मुंबई : लोकसभेत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील प्रश्नांची बाजू मांडणारे खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे 2023 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मात्र पक्षातंर्गत विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे, असा गंभीर आरोप दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी केला. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता आमच्या पक्षात भाजपाच्या पेरोलवर चालणारे काही लोक आहेत, असेही म्हटले आहे. (Pratibha Dhanorkar My husband lost his life because of internal opposition Some people in our party are on the payroll of BJP)

हेही वाचा – Nilesh Lanke : राजकारण क्षणाक्षणाला बदलत असतं, शरद पवारांच्या पक्षात जाण्याबाबत संदिग्धता

- Advertisement -

प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, काँग्रेस पक्षातले काही लोक सातत्याने माझा विरोध करत आहेत आणि याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे. कारण आमच्या पक्षात भाजपाच्या पेरोलवर चालणारे काही लोक आहेत. भाजपवाले जी ऑर्डर देतात ती ते फॉलो करतात. प्रतिभा धानोरकर यांचा रोख कोणाकडे होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. तसेच प्रतिभा धानोरकर यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चाही होताना दिसत आहे.

प्रतिभा धानोरकर भाजपा जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून मी नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र यामागे आमच्याच पक्षातील काही लोकांचा हात आहे आणि ही सर्व अफवा भाजपच्या सांगण्यावरून पसरवली जात आहे, असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Amravati : पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा चिघळला; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज

लोकसभा उमेदवारीवरून बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, चंद्रपूर लोकसभेवर कोणीही दावेदारी केली तरी पहिला हक्क माझा आहे. मी नुकतीच काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी माझे सगळं ऐकून घेतले असून ते या संदर्भात सकारात्मक आहेत. मात्र काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठलाही निर्णय होत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप कुठलीही यादी जाहीर झाली नसल्याने मी सध्या याबाबत काही सांगू शकत नाही. मात्र काहीही झाले तरी मीच काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असा पुनरुच्चार प्रतिभा धानोरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -