घरमनोरंजनSwapnil Joshi : ‘नाच गं घुमा’नंतर स्वप्नील जोशीने केली नव्या चित्रपटाची घोषणा!

Swapnil Joshi : ‘नाच गं घुमा’नंतर स्वप्नील जोशीने केली नव्या चित्रपटाची घोषणा!

Subscribe

‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती विश्वात पदार्पण केल्यानंतर आता महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट येत्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

2024 वर्ष स्वप्नीलसाठी खास ठरणार आहे. स्वप्नील अभिनेता म्हणून “बाई गं ” या सिनेमामध्ये दिसणार आहे. निर्मिती , अभिनय आणि अजून बऱ्याच विविधांगी रूपातून स्वप्नील येणाऱ्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. 2024 या वर्षात स्वप्नील या दोन्ही स्त्रीकेंद्रित सिनेमाशी जोडला गेला आहे, याशिवाय तो आणखी कोणते वेगळे प्रयोग करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. 14 जून 2024 रोजी “बाई गं ” सिनेमा रिलीज होणार असून स्वप्नीलसोबत या चित्रपटात अजून कोण कोण दिसणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

- Advertisement -

Bai Ga Movie Poster

बाई गं’मध्ये स्वप्नीलबरोबर मुख्य भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. याबद्दल अभिनेता म्हणतो, ‘नाच गं घुमा’नंतर मी लगेच ‘बाई गं’सारखा चित्रपट करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या चित्रपटात माझी भूमिका काय आहे हे सर्वांसमोर स्पष्ट होईल. 2024 मध्ये मी खूप काम करतोय आणि तुमचं न थांबता मनोरंजन करता येतंय या सारखं वेगळं सुख काय असणार ना! ‘बाई गं’मध्ये नक्कीच काहीतरी खास असणार आहे परंतु यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.

- Advertisement -

स्वप्नीलच्या इतर कामाविषयी बोलायचे झाल्यास तो या सिनेमांव्यतिरिक्त प्रसाद खांडेकर दिग्दर्शित सिनेमात दिसणार आहे. प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, वनिता खरात यांच्यासह अनेक विनोदी कलाकार या सिनेमात दिसतील. याशिवाय स्वप्नील जोशी बहुचर्चित ‘नवरा माझा नवसाचा 2 ‘मध्येही मुख्य भूमिकेत आहे. एकंदरित 2024 हे वर्ष स्वप्नीलसाठी खूपच व्यग्र वेळापत्रक असणारं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -